विश्वात श्रेष्ठ “भारतीय राज्य घटना” ‘ -डॉ. अंकुश आगलावे The world’s greatest “indian state constitution” – Dr.ankush aaglawe 

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.15 एप्रिल) :-

                   संपूर्ण विश्वात भारतीय राज्य घटना श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन राजे छत्रपती सेना भद्रावती चे अध्यक्ष डॉ. अंकुश आगलावे यांनी भद्रावती येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रसंगी केले. सदर्हू कार्यक्रमाचे आयोजन राजे छत्रपती सेना संगठनच्या वतीने करण्यात आले.

या प्रसंगी डॉ आगलावे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, बाबासाहेबांनी घटनेच्या कलम 340 मध्ये सर्वप्रथम 52 टक्के ओबीसीचा विचार करून आरक्षण दिले. जो पर्यंत ओबीसी समाज शिक्षित होणार नाही तो पर्यंत बाबासाहेबांचे विचार समजणार नाही. वंचित शोषितांना न्याय मिळवून देण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असल्याचे यावेळी सांगितले.  

संपूर्ण जगात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते. जगातील मोठे कायदेपंडीत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेबांनी संपूर्ण विश्वातील श्रेष्ठ राज्य घटना भारतीयांना दिलेली आहे. भारत देशाचा राज्य कारभार हा संविधानाने चालतो असे डॉ. आगलावे यांनी सांगितले. भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी भारतीय संविधान व ग्रामगीताच मुूख्य भुमिका बजाविणार असल्याचे सांगितले.

या प्रसंगी बंुदीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात नरेंद्र जीवतोडे , योगेश वाळके, विक्की सातपुते, गजानन पिंपळकर बंटी तसेच राजे छत्रपती सेनाचे सदस्य, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.