शेगाव ची कल्याणी विद्यापीठात पहिली Kalyani University of Shegaon first

🔸शेतकऱ्याच्या मुलीची उत्तुंग भरारी

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बु (दि.12 एप्रिल) :- मधील कल्याणी दत्तात्रय शिंगरू हीने एम. एस. सी. बोटानी या विभागातून संपूर्ण गोंडवाना विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादित केले.

कल्याणी ही वरोरा तालुकातील शेगाव (बु) या गावातील रहिवासी आहे. तिचे वडील शेती करतात. कल्याणीचे 10 वी पर्यंत चे शिक्षण नेहरू विद्यालय, शेगाव येथूनच झाले असून 11 वी पासून तिने आनंद निकेतन कॉलेज वरोरा इथे प्रवेश घेतला. ग्रामीण भागातून आल्यामुळे अथक प्रयत्न करून तिने एम. एस. सी. बोटानी विभागतून (9.40) सी. जी. पी. ए. मिळवत विद्यापिठातून प्रथम क्रमांक प्राप्त करून आनंद निकेतन कॉलेज, वरोरा सोबतच शेगाव गावाचं नाव मोठे केले.

कल्याणी ने आपल्या यशाचे श्रेय आई- वडील, मोठी बहीण व शिक्षकवृंद यांना दिले.