🔸भद्रनाग स्वामी महाराज मंदिरात पूजाअर्चा
🔹 शिवसेना (ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व
✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadravti प्रतिनिधी)
भद्रावती (दि.8 एप्रिल) :- स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या दि. ३० एप्रिल रोजी होत आहे. या निवडणूकीच्या रणसंग्रामात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष उतरला आहे. पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात येत आहे. भद्रावती तालुक्यातील सहकार व ग्रामीण क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्थानिक भद्रनाग स्वामी महाराज मंदिरात पूजाअर्चा करून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.
काल दि. ७ एप्रिल रोज शुक्रवारला भद्रावती तालुक्याचे आराध्य दैवत श्री भद्रनाग स्वामी महाराज मंदिर येथे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या शुभ हस्ते पुजाअर्चा केल्यानंतर नारळ फोडून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजणे, तालुका प्रमुख तथा नगरसेवक नरेंद्र पढाल, भद्रावती नागरी सहकारी पत संस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक व माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डूकरे, माजी नगरसेवक तथा गुरुजी फाऊन्डेशचे अध्यक्ष प्रशांत कारेकर, अखील भारतीय सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा पानवडाळा ग्रा.पं. सरपंच प्रदिप महाकुलकर.
मुधोली ग्रा.पं.सरपंच बंडू पा. नन्नावरे,नंदोरी ग्रा.पं. उपसरपंच मंगेश भोयर, मुरसा ग्रा.पं. उपसरंपच सुनिल मोरे, भद्रावती कृ. उ. बा.स. च्या माजी उपसभापती अश्लेषा जीवतोडे- भोयर, शांता रासेकर यांच्यासह तालुक्यातील ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांच्यासह असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.