✒️ सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)
पुणे (दि.3 एप्रिल) :- माता रमाई यांची १२५ वी जयंती व महिला दिनानिमित्त आम्ही आयोजित केलेला कार्यक्रम जीवनातील अतिशय सुखद अनुभव देणारा प्रसंग ठरला. माता रमाईच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा आमच्या प्रामाणिक प्रयत्नाला यश मिळताना दिसत आहे.
वर्षाच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांसोबत झालेल्या चर्चेमधील ठरावामुळेच ‘बाईक रॅली’ काढण्यात यश आले व रॅलीच्या माध्यमातून मिळालेला प्रतिसाद आम्हाला ऊर्जा, हिम्मत, बळ देणारा ठरला म्हणूनच ‘महिला मेळावा’ हा कार्यक्रम (मी स्वतः महिला नसताना) करण्याचे धाडस आले. कार्यक्रमाचे आयोजन महिन्याभरापासून चालू होते. सोशल मिडिया, कॉर्नर मिटिंग, वैयक्तिक भेटीगाठीच्या माध्यमातून खुप लोकांचा संपर्क लाभला.शेकडोच्या संख्येने कॉल्स आले.अभिनंदनाचा वर्षाव झाला.
याचे मलाच माझे कौतुक वाटत आहे की, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर लोकं, मित्र, कारकर्ते,समाज इतक्या प्रमाणावर प्रेम करत आहे, आशीर्वाद देत आहेत. हा प्रकार माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यासाठी अविस्मरणीय असा ‘अनमोल साठा’ आहे, जो मी माझ्या काळजाच्या कोठडीत कायम कोंडून ठेवणार. असो, कालच्या कार्यक्रमात, महिला सक्षमीकरण नाटक, एक पात्री एकांकिका, ‘MHJ’ महा हास्य जत्रा फेम ‘मोनल कडलक’ च्या स्वरा-संगीताचा तडका म्हणजे या कार्यक्रमाच्या आकर्षनाचे केंद्रबिंदू ठरले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला इतक्या मोठया संख्येने येणाऱ्या महिला आणि मोनल कडलकच्या गाण्यावर थिरकणाऱ्या लहान मुली, तरुणी यांना पाहून भर कार्यक्रमातच आम्ही केलेल्या आयोजनाची पावती मिळाली होती, याचे समाधान वाटत होते.
पुरस्कार प्राप्त महिला, फेम मोनल कडलक, नाटक कलाकार, उपस्थित महिला, बंधू-भगिनी, कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता मेहनत घेणारे कार्यकर्ते, मित्र परिवार, छुपे-खुले हितचिंतक , टिका टिपणी करणारा मित्र वर्ग या सर्वांचे मनापासून अभिनंदन व आभार व्यक्त करतो आणि आपले प्रेम असेच असू द्या ही पुन्हा एकदा साद घालतो की, जेने करुन पुढील कार्यक्रमासाठी पुन्हा खतपाणी मिळो व आपल्या साक्षीने हे वर्ष माता रमाईच्या नावे धूमधडक्यात साजरे होत राहो व अशाच नव्या कार्यक्रमात पुन्हा भेटण्याचे औचित्य घडो…
असो, माता रमाईच्या जयंती निमित्त सुरुवात केलेला हा ‘कारवा’ पुढे वर्षानुवर्षे असाच चालत राहील यासाठी आम्ही कातिबद्ध व नेहमीच प्रयत्नशील असू.कालचा दिवस ऐतिहासिक ठरला!आम्ही सुरुवात केली…
तुम्ही जोरात करा…
जय भीम
विकी शिंगारे