✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravti प्रतिनिधी)
भद्रावती (दि.20 मार्च) :- तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम म्हणून नावारूपास आलेले मौजा चंदन खेडा हे गाव नेहमीच चर्चेत असते. राज्यातील शासकीय निमशासकीय शाळा चे शिक्षकांनी 14 मार्च पासून जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी संप पुकारले आहे त्यामुळे गावागावतील शाळा ओसाड पडल्या आहे आणि शिक्षकांनी विद्यार्थ्याना वाऱ्यावर सोडले.
त्या मुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे फार मोठे नुकसान होत आहे. मागील कोरोना काळात २ वर्ष वाया गेली तेव्हाही विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान झाले. त्या मुळे आपल्या पाल्याचे नुकसान नाही व्हावे उद्देशाने ग्रामपंचायत सरपंच श्री. नयन बाबाराव जांभुळे उपसरपंच सौ. भारती शरद उरकंडे व ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अनिल कोकुडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी पुढाकार घेत आज दिनांक २० मार्च २०२३ पासून शाळा सुरू केली आणि विद्यार्थ्याना शिक्षणाचे धडे देण्याकरिता गावातील शिक्षित युवक व युवती नी पुढाकार घेतला.
ऐंन परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांनी फुकरलेल्या संपा मूळे विद्यार्थी शिकाशाणा पासून वंचित राहिले असते परंतु या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे या उपक्रमाची गावातील पालक वेगानं कडून कौतुक केले जात आहे.