सरकारी नोकऱ भरत्या टप्प्या टप्प्यानी न घेता एकाच वेळी घ्याव्या – अमर गोंडाने Government job recruitment should be done all at once instead of step by step – Amar gondane 

Share News

🔹 20 मार्चला विधानसभा घेराव

वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.18 मार्च ):-युवक काँग्रेस महाराष्ट्र च्या वतीने 20 मार्च रोजी ‘विधानसभा घेराव ‘ आंदोलन केले जाणार आहे. कारण राज्यात तसेच देशात सध्यास्थितीत मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे , महागाईमुळे सर्व सामान्य जनतेचे हाल – बेहाल होत आहेत.

राज्यातील युवकांना रोजगार देणारे मोठमोठे प्रकल्प केंद्र सरकारकरवी इतर राज्यात स्थलांतरीत केले जात आहेत. शिंदे – फडणवीस सरकार सरकारी नोकऱ्या खाजगीकरणा कडे घेऊन जात आहेत म्हणून या सर्व बाबीचा निषेध म्हणून हे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात “टप्प्याटप्प्याने होणारी नोकर भरती एकाच वेळी संपूर्ण भरती केली जावी ” ही मागणी सुद्धा मुख्य अजेंड्यावर असावी अशी मागणी युवक काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अमर गोंडाने यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सत्तेत असलेलं सरकार युवकांना खुश करण्यासाठी नोकर भरतीचा आकडा फुगवून सांगून मोठमोठी आश्वसन देतात. शिक्षक भरतीच्या माध्यमातून 34 हजार पद भरली जाणार , पोलीस भारतीची 18 हजार पद भरली जाणार , आरोग्य भरतीचे 10 हजार पद भरली जाणार आशी जाहिरात बाजी करतात .

प्रत्येकक्षात मात्र हे आकडे टप्या-टप्प्यांनी भरली जातात. त्यामुळे बऱ्याच युवकांनी वयाच्या अटीमुळे आपली संधी गमावलेली असते. त्यामुळे त्यांचा पदरी निराशा येते. म्हणून राज्य शासनाने जाहीर केलेली नोकरभरती टप्प्याटप्प्याने न भरता एकाच वेळी संपूर्ण भरती घ्यावी अशी मागणी अमर गोंडाने यांनी केली आहे.

Share News

More From Author

बापरे.. धक्कादायक बातमी. भद्रावतीमधे वेश्यव्यवसाय वर पोलिसांची धाड Wow shocking news. police raid on prostitution in bhadravati 

चंदनखेडा येथील वादग्रस्त जागेचे प्रकरण तं.मु.स.अध्यक्ष तळमळीचे युवा मनोहर शालिक हनवते यांनी घेतली दखल The case of the disputed land in chandankheda was taken into consideration by tantamukt camiti president Yuva manohal shalik hanwate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *