🔹वीज वितरण कंपनीने कुनाडा गावचा खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत् सुरु करावा : रविंद्र शिंदे
Ravindra shinde should restore the interrupted electricity supply to kunada village by the power distribution company
🔸पूर्व सुचना न देताच विज कनेक्शन कापल्याने कुनाडा ग्रामस्थ संतापले
The villagers of kunada were enraged as the electricity connection was cut off without prior notice
✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadravti प्रतिनिधी)
भद्रावती (दि.4 मार्च) : -तालुक्यातील वेकोलि पुनर्वसीत कुनाडा गावातील वीज कनेक्शन महावितरण कंपनीने दि. १ मार्च २०२३ रोजी कुठल्याही प्रकारची पुर्व सुचना न देताच कापल्याने ग्रामस्थ संतापले आहे. यामुळे इय्यता दहावी व बारावीच्या ऐन परीक्षेच्या कालावधीतच गावातील विजपुरवठा खंडीत केल्याने येथील विद्यार्थांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच गावातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.वीज वितरण कंपनीने कुनाडा गावाचा खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत् सुरु करावा . अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केली आहे.
वीज वितरण कंपनीने कुनाडा गावाचा वीज पुरवठा खंडित केल्याने कुनाडा ग्रामस्थानी आज दि. ३ मार्च रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविद्र शिंदे यांना निवेदन दिले. प्रकरण गंभीर असल्याने रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात आज शुक्रवार रोजी शिवसेना पदाधिकारी व कुनाडा ग्रामस्थासह पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली . तहसीलदार यांना निवेदन सुध्दा देण्यात आले. तात्काळ उपाययोजना न झाल्यास उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
पत्रकार परिषदेत वरोरा-भद्रावती विधानसभा समन्वयक तथा माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास कोंगरे, संचालक अरुण घुगुल, रविंद्र आवारी, सुरेश उमाटे, सुरेश बावणे, डॉ. नरेंद्र दाते, सईबाई कश्यप, ज्योती कोमटी, शोभा बावणे, वंदना शिरपूरकर, वंदना बावणे, रत्ना आत्राम, वंदना भडके व ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रामस्थानी सांगितले की, २०१० मध्ये वेकोलिच्या वतीने कुनाडा गावाचे पुनर्वसन करण्यात आले. वेकोलि मार्फत वीज व पाण्याची सुविधा करण्यात आली. २०१० मध्येच महावितरण कंपनीने ग्रामस्थांना असे कळविले की , ज्यांच्याकडे जूने मिटर आहेत. अशाकडून तीनशे रुपये भरल्यानंतर जुन्या मिटरच्या बदल्यात नविन मिटर बसवून देण्यात येईल . तसेच ज्यांच्याकडे मिटर नाहीत अशा ग्रामस्थांनी अकराशे रुपये नविन डिमांड भरल्यानंतर नविन मिटर लावून देण्यात येईल. असे कळविले.कुनाडा ग्रामस्थांनी तीनशे व अकराशे रुपये अशी रक्कम डिमांड स्वरूपात संबंधीत विभागाकडे भरली. यापैकी २०१०-२०११ मध्ये महावितरणकडून केवळ दहा बारा जणांच्या घरी मिटर बसवून देण्यात आले. अन्य ग्रामस्थांचे जुने मिटर ही बदलले नाही तसेच नविन मिटर ही बसवून देण्यात आले नाही. २०१२ मध्ये महावितरणे शपथपत्र सुद्धा लिहून घेतले. गामस्थांनी सदर शपथपत्र लिहून सुद्धा दिले. ही सर्व प्रक्रिया करुन सुध्दा २०१५ पर्यंत कुठलेच मिटर बसवुन देण्यात आले नाही.
एप्रिल २०१५ मध्ये महावितरणने ग्रामस्थांवर दंड ठोठावला. दंड भरल्याशिवाय मिटर लावण्यात येणार नाही. अशी ताकीद दिली. ग्रामस्थांनी संबंधीत विभागाचा दंड भरला. परंतु विजजोडणी करण्यात आली नाही. तसेच नविन मिटर सुद्धा बसवून देण्यात आले नाही. नोव्हेंबर – डिसेंबर २०२२ मध्ये महावितरण कंपनीने येथील ग्रामस्थांना वीज चोरी केली असे सांगून वीज चोरीची बील दिले.ज्याची रक्कम हजार ते लाखा पर्यंत आहे. १ मार्च २०२३ रोजी संबंधीत विभागाने कुठलीही पुर्व सुचना न देता संपूर्ण गावाची वीज बंद केली. यावेळी आमच्या मालमतेचे नुकसान करण्यात आले. आम्ही स्वतः विकत घेतलेले केबलसुध्दा कापण्यात आले. घरी कुणी नसतांना वीज मिटर काढून नेण्यात आले. जागोजागी लाईन बंद करण्यात आली. असा आरोप ग्रामस्थांनी महावितरण कंपनीवर केला आहे.
आजच्या पत्रकार परिषदेत कल्पना कोमटी, वंदना शिरपुरकर, संगिता बावणे, छाया बावणे, इंदू बावणे, वंदना माणुसमारे, ताई बावणे, संगिता बावणे, अमिता कोमटी, सुमित्रा दाते, मंगला बिपटे, वेणू बावणे, किशोर बिपटे, अरविंद तोडकर, गजानन सतई, अमोल श्रीखंडे, नितीन कावटे, प्रवीण ढवस, नरेंद्र बोबडे, भोजराज पथाडे, सुरेश मन्ने, रघुनाथ कुळमेथे, कवडू नंदुरकर, संदीप बावणे, सुरेंद्र नंदुरकर, मधुकर कोमटी, विजय कुरईत, रामभाऊ बिपटे, सुनील समर्थ, सुरेश महाजन, भारत बेसेकर, दिनकर आस्कर, शंकर श्रीखंडे महेंद्र आस्कर, रामकृष्ण आस्कर, अक्षय महाजन, मुकेश बिपटे, विनोद तिराणकर, श्रावण दाते, रवींद्र आस्कर व कश्यप यांचे सह असंख्य कुनाडा ग्रामस्थ उपस्थित होते.