✒️ वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा (दि.6 जानेवारी):- आपले आरोग्य हिच आपली मुख्य संपती आहे त्याची काळजी घेतली पाहिजे प्रत्येकांनी आपल्या आरोग्याची नियमितपणे तपासणी केली पाहिजे असे प्रतिपादन खासदार बाळु भाऊ धानोरकर यांनी खांबाडा येथील ‘आरोग्य सेवा सप्ताहा’चे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा तालुक्यात खांबाडा, माढेळी, नागरी, चदंनखेडा, टेंभुर्डा, शेगाव, आदी ठिकाणी आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
आज दि ४ जानेवारी ला सकाळी ११.३० वाजता खांबाडा येथील आरोग्य सेवा सप्ताहाचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून खासदार बाळू भाऊ धानोरकर, उद्घाटक आमदार प्रतिभाताई धानोरकर, प्रमुख अतिथी वरोरा तालुका काँग्रेस कमेटी चे तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, सरपंच प्रकाश शेळकी, माजी प स सदस्य शालीक झाडे, पोलीस पाटील अरविंद शेळकी, रत्ना अहिरकर,कोसरसार चे सरपंच गणेश मडावी, माजी सरपंच विलास गावंडे, शाळा समिती चे विशाल देवतळे, केंद्रप्रमुख संजय बोबडे, मुख्याध्यापक व्हि पडवे, आरोग्य अधिकारी डॉ बाळू मूजंनकर, प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार चे वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन धोंगडे, खाबांडा आदिवासी सेवा संस्थेचे अध्यक्ष सुनिल देवराव गेडाम,उमेद अभियान वरोराचे अरुण चौधरी, पत्रकार अविनाश बन, प्रकाश कडूकर, गजानन दूशेटीवार, पद्माकर कडूकर,अनिवृध्द देठे, दिवाकर निखाडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आली. त्यानंतर अतिथी चे पुष्पगुच्छ देऊन तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गिताने स्वागत करण्यात आले. नंतर खासदार बाळू भाऊ धानोरकर,खांबाडा येथील प्रतिष्ठित शेतकरी वासुदेव देठे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, मिलिंद भोयर, यांनी फित कापून रितसर आरोग्य सेवा शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. ज्योती वाघ यांनी तर प्रकाश कडूकर यांनी आभार मानले.
या आरोग्य सेवा शिबिराच्या निमित्ताने खासदार बाळू भाऊ धानोरकर तथा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते उत्कृष्ट शेतकरी विलास गावंडे, देशाच्या सिमेवर कार्यरत असलेले विठ्ठल रहाटे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई, पत्रकार अविनाश बन, तथा आरोग्य विभागातील सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी अधिकाधिक महिलांची श लक्षणीय उपस्थिती असल्याचे समाधान आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले.