✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा (दि.10 सप्टेंबर) :- आसाळा येथील त्रिमूर्ती गणेश मंडळाचे स्थापना करण्यात आली.आज त्या स्थापनेला 33 व्या घटस्थापणे निमित्त तसेच तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी नेते श्री किशोर डुकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने अमन ब्लड बँक नागपूर मार्फत सायंकाळी चार वाजता त्रिमूर्ती गणेश मंडळ आसाळा मार्फत रक्तदान शिबीर आयोजन केले आहे .
तरी परिसरातील जनतेने तसेच नव युवकांनी रक्तदान करून सत्कर्म करावे करिता या होणाऱ्या या शिबिरात सामील व्हावे असे आव्हान त्रिमूर्ती गणेश मंडळ आसाळा मार्फत समस्त जनतेला करण्यात येत आहे.