29 डिसें. ला  कान्सा ( सि.) येथे भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिर 

🔸स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट ,श्री. गुरुदेव सेवा मंडळ आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय.सावंगी ( मेघे ) यांचा संयुक्त उपक्रम

✒️ मनोज कसारेभद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.28 डिसेंबर) :- तालुक्यातील कान्सा ( सि.) येथे श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियांतर्गत 26 डिसेंबर श्रध्देय बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त दि. २९ डिसेंबर रोज शुक्रवार रोजी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत या कालावधीत गावातील ग्रा.पं. पटांगणावर स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, श्री. गुरुदेव सेवा मंडळ कान्सा (सि.) आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.

 स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट जनसामान्याच्या भल्याकरीता विविध उपक्रम तसेच अभियान राबवित आहे. यातील एक उपक्रम श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियानाअंतर्गत रोग निदान शिबीराचे आयोजन करीत असते.  समाजातील सर्व घटकांनाकरीता, गरीब व गरजू जनतेचे आरोग्य अबाधीत ठेवण्याकरीता निशुल्क शिबीरे आयोजित करण्यात येत असते. 

 श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियानाअंतर्गत ट्रस्टच्या वतीने हे सहावे आरोग्य शिबीर असून या आधी कोंढा, खांबाडा, पिपरी, वरोरा व भद्रावती येथे निशुल्क शिबीरे आयोजीत करण्यात आले आहे. या शिबारातील गंभीर स्वरुपाच्या गरजू गरीब रुग्णाना पुढील उपचाराकरीता सावंगी मेघे येथे पाठविल्या जाते तसेच भरती रुग्णांना ट्रस्टच्या माध्यमातून मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाते व त्यांच्या उपचाराचा खर्च ट्रस्टकडून केल्या जातो.

 स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून भद्रावती तालुक्यातील कान्सा येथे 29 डिसेंबरला आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्त सुधाकरजी कडू यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या शिबिरात गरीब व गरजू रुग्णांचा मोफत उपचार करण्यात येईल. याप्रसंगी मेडिसीन, द्ददयरोग, नेत्ररोग, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थीरोग, त्वचारोग, कान नाक व घसा रोग, श्वसन, मानसिक रोग विषयक तज्ज्ञ डॉक्टर मंडळी रुग्णांचे निदान व उपचार करतील.

 भरती रुग्णांना हॉस्पीटलमध्ये जाण्याकरीता वाहनांची व्यवस्था मोफत राहील. शिबिरामध्ये येतांना रुग्णांनी आधार कार्ड व राशन कार्ड सोबत आणावे. भद्रावती तालुक्यातील जनतेनी या रोगनिदान व उपचार शिबिराचा लाभ घ्यावा, असे संयुक्त आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष धनराज पा. आस्वले, ट्रस्टचे संस्थापक तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे, भद्रावती कृ.उ.बा. समिती सभापती तथा उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजणे, नंदोरी ग्रा.प. सरपंच तथा विधानसभा संघटक मंगेश भोयर, माजी नगरसेवक तथा भद्रावती तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल, ट्रस्टचे कार्यवाहक वर्षा कुरेकार व अनुप कुटेमाटे, सामाजिक कार्यकर्ते मुर्लीधर उमाटे, सचिव संजय तोगट्टीवार, कान्सा (सि.) ग्रा. प. सरपंच मयुर टोंग, विकास पा. मत्ते, हरीभाऊ रोडे, शेखर घुगुल, पुरुषोत्तम चौधरी, सुनिल मत्ते, प्र फुल आसुटकर, निखील मत्ते, प्रशांत पिदुरकर, कुसुम रोडे, सुभद्रा रोडे, शारदा आसुटकर तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळ कान्सा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे

 

ट्रस्टच्या विविध उपक्रमांचा जनतेनी लाभ घ्यावा – रविंद्र शिंदे

गोरगरीब, सर्वसामान्य गरजू आणि अडचणीत असलेल्या जनतेला एक हात मदतीचा देण्याकरीता स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चोवीस तास तत्पर आहे.

ट्रस्टच्या माध्यमातून श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान, अनाथांची माई सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना, विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम आणि कै. म.ना. पावडे क्रीडा स्पर्धा आदि उपक्रमांतर्गत मदत कार्य अविरतपणे सुरू आहे.

गोरगरीब, सर्वसामान्य गरजू आणि अडचणीत असलेल्या जनतेनी मदतीसाठी  नि :संकोचपणे ट्रस्ट सोबत संपर्क साधावा. असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे यांनी केले आहे.*