✒️ भद्रावती (Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
भद्रावती(दि.3 मे) :- तालुक्यातील वायगाव तु. येथे जय हिंद सामाजिक संघटना व श्री जगन्नाथ बाबा विद्यालय यांच्या प्रयत्नातून गावामध्ये पहिल्यांदा summer camp 2025 हा उपक्रम राबवण्यात आला.
शाळा संपल्यानंतर मुलांचे सामाजिक व कौशल्य वाढवण्याच्या दृष्टीकोनातून हा 3 दिवसीय कॅम्प आयोजित केला होता. त्यात विविध स्पर्धा, श्रमदान व प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी, शिक्षकवृंद, गावकरी यांचा उत्स्फूर्थ असा सहभाग लाभला. कार्यक्रमाची सांगता 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष धानोरकर सर प्रमुख पाहुणे वानखेडे सर, मडावी सर यांची उपस्थिती होती. स्पर्धेत उत्तीर्ण मुलांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. मागच्या वर्षी गावातील शालेय शिक्षणात परिश्रम घेऊन उत्तीर्ण झालेल्या मुले तुषार कुरेकर, संदेश टेम्भूर्ने, सुरज टेम्भूर्ने व त्यांच्या वडिलांचा सन्मान करण्यात आला.
गावामध्ये पहिल्यांदा उत्कृष्ट शेतकरी म्हणून श्री. अनिल नागरकर यांना हा पुरस्कार प्रधान करण्यात आला. गावात व्यसनमुक्ती साठी विशेष योगदान देणारी तंटामुक्ती समितीचे यांचे स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन संघटनेचे कार्यकर्ते कैलाश आगलावे, अमर ढोक, अभिलाष भागडे, श्यामदेव काकडे, निलीमा कुरेकर, वच्छला नागोसे, मंगेश मेश्राम व विशाल कुरेकर यांनी केले तसेच संचालन श्री. बोढाले सर यांनी केले.