🔹दुचाकी स्वारांचे दररोज अपघात
🔸के. सी. सी. कंपनी आणखी किती लोकांचे बळी घेणार
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.28 मार्च) :- वरोरा शेगाव चिमूर नॅशनल हायवे रोड चे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून सदर या रस्ता निर्मिती करण्याचे कंत्राट हे एस. आर.के. कंपनी कडे असून या कंपनीने उर्वरित काम पूर्ण करण्याचे कंत्राट के. सी. सी. कंपनी कडे सोपविण्यात आले ही कंपनी आपली मनमानी करून कमी वेळा मध्ये जास्त काम कसे करता येईल याकडे अधिक लक्ष दिले परंतु तातडीने करण्यात आलेले रस्त्याचे काम हे निष्कृष्ट दर्जाचे झाले असून या रस्त्याचा कालावधी कमी असल्याचा दिसून येत आहे.
शिवाय काही दोन तीन महिन्या आधी करण्यात आलेल्या कामात सुद्धा गैर व्यवहार झाला असल्याचे दिसून येत आहे. भर रस्त्यावर आडव्या तिडव्या मोठ मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर भगदाड भेगा पडल्या या भेगा भगदड मुळे दुचाकी स्वार न कळत या भेगा वरून गेल्यास नक्कीच खाली पडतो यात दुचाकी वर बसलेले सर्वच स्वार दुखापती होऊन छोटे मोठे अपघात नक्की होत असते तर काहीना कायमचे अपगत्व स्वीकारावे लागते तर काहीना मरण पत्करावे लागते .सर्वात जास्त अपघात हे रात्रौल होत असतात. रस्त्यावर धावत असलेले काही सामाजिक कार्यकर्ते अपघात ग्रस्त यांची काळजी घेत त्यांना रुग्णालय पर्यंत पोहचवतात तर काही जनता मागची बला टाळण्यासाठी तेथून आपला पळ काढतात. व रुग्णांना राम भरोसे सोडतात.
परंतु शेगाव बूज येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल भाऊ जाधव हे गेल्या अनेक अश्या पीडित रुग्णाची सेवा करीत त्यांना रुग्णालय पर्यंत पोहचविणे, रुग्णाची विचारपूस करून त्यांना हवी ती मदत करणे त्यांना पैशाची गरज असल्यास पैसे देणे अशी समाज सेवा ते करीत आहे. करिता निष्कृष्ट दर्जाचा रस्ता निर्मिती करणाऱ्या के. सी. सी. कंपनीवर कठोर कारवाई का करण्यात येऊ नये.? असा सवाल देखील त्यांनी व्यक्त केला. करिता जनतेच्या जीवाशी चालणारा प्राण घातक खेळ तत्काळ संपविण्यात यावा व रस्त्यावर पडलेले मोठ मोठे भगदाड कायमचे बंद बुजविण्यात यावे अशी मागणी श्री अनिल भाऊ जाधव यांनी केली आहे. अन्यथा कंपनी समोर कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन देखील पुकारण्यात येईल अशी धमक देखील यावेळी त्यांनी दिली..
“मी या रस्त्याने दररोज येजा करीत असतो व मला या मार्गावर माझ्या समोर अनेक अपघात झालेत मी त्यांना रुग्णालय पर्यंत पोहचविले तर काही रुग्णांना आर्थिक तसेच हवी ती मदत केली सर्व अपघात हे रस्त्यावर पडलेल्या भगदाडी मुळे होत असून या भेगाचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा नाहीतर के . सी . सी. कंपनी विरोधात बंड पुकारून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास भाग पाडू”
श्री अनिल जाधव सामा. कार्य. शेगाव बूज..