✒️वणी(Wani विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वणी(दि.28 मार्च) :- श्रीक्षेत्र भांदेवाडा येथील ‘ब’ वर्ग तिर्थ क्षेत्र असलेल्या विदेही सद्गुरू जगन्नाथ बाबा संस्थानात सद्गुरू जगन्नाथ बाबा यांचा जन्मोत्सव व रामनवमी उत्सव सोहळा दिनांक 30-03-2025 ते 06-04-2025 गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत साजरा करण्यात येणारं आहे.
यामध्ये गुढीपाडवा च्या दिवशी सकाळी 9.16 ला सद्गुरूबंधु श्री. वसंतराव झोलबाजी धानोरकर यांचे हस्ते घटस्थापना व गुढी उभारणे… तसेच रोज दैनिक संगीतमय श्रीमद भागवत व विदेही सद्गुरू जगन्नाथ बाबा कथा सप्ताह भागवतप्रवक्ते ह. भ. प. प्रशांत महाराज भोयर (झरीजामनी ) यांच्या सुमधुर वाणीतून होणार आहे.
यामध्ये रोज सकाळी काकडा, भागवत कथा पारायण तसेच सायंकाळी हरिपाठ आणि त्यानंतर किर्तन भजन इत्यादी कार्यक्रम होणार असुन…. अखंड विनावादन होणार आहे रामनवमीच्या अगोदर च्या दिवशी येणाऱ्या पालख्यांची पूजा तसेच सायंकाळी ह.भ.प. सुरेश महाराज तरवटकर यांचे सृश्रव्य किर्तन.. रामनवमी दिवशी सकाळी सद्गुरू जगन्नाथ बाबा यांचा पालखी सोहळा पूजा.. दुपारी 12 वाजता सद्गुरू जगन्नाथ बाबा जन्मोत्सव सोहळा काल्याचे किर्तन दहीहंडी आरती करण्यात येईल .
त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणारं आहे… तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आलेले आहे