✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू(दि.28 मार्च) :- येथून जवळच असलेल्या वरोरा तालुक्यातील सालोरी येथे गुरूवारी (दि. २७ मार्च रोजी) ब्रम्हलीन श्री रंगनाथ स्वामी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सालोरी येथील श्री संत परमहंस सद्गुरू रंगनाथ बाबा संस्थान तर्फे पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी सकाळी ७ वाजता भजनाच्या गजरात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी किर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
मागील अनेक वर्षांपासून सालोरी येथे परमहंस श्री रंगनाथ बाबांची पुण्यथिती साजरी करण्यात येत आहे. पुण्यतिथी उत्सवात गावातील तरुण मंडळी घनराज बगळे, सौरभ डांगरी, अनुप तुमसरे, भाविक काळे, रवी पोहणे, गजानन आसेकर, मयूर डांगरी, नयन तुमसरे, गोलू तुमसरे, पीयूष निखाते, राहुल शेरकुरे, श्रावण शेंडे, निकेश पाटील, मनोज ढोक, सूरज शेंडे, पियूष काळे यांनी सहकार्य केले.