भद्रावती(Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
भद्रावती (दि.23 मार्च) :- तालुक्यातील वायगावं ( तु.) येथील सुप्रसिद्ध गझलकार, कवी सुनील बावणे – निल यांच्या ‘स्याडा कोठसा भरते’ या झाडी बोलीतील त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा स्वर्गीय विना आडेकर प्रतिष्ठान भद्रावती यांच्यावतीने आयोजित स्मृतिगंध काव्य मंचावर संमेलनाध्यक्ष अध्यक्ष मान. ना.गो काळे जेष्ठ साहित्यिक, मान. आचार्य ना.गो. थुटे . मान. बळवंत भोयर. मान. श्रीपाद जोशी. मान. विशाखा कांबळे. मान.आस्वले सर. मान. विद्याधर बन्सोड. मान. प्रवीण आडेकर. मान. इरफान शेख. मान. प्रदीप देशमुख श्याम मोहरकर.मान महादेव बावणे. तसेच वरोरा झाडी बोली शाखा मंडळाचे मान्यवर सभासद ,विचार मंचावरील मान्यवरांच्या हस्ते यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी वरोरा झाडी बोली शाखा मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक श्रीमान ना.गो. थुटे, शाखाध्यक्ष मान. पंडित लोंढे सर, सचिव चंद्रशेखर कानकाटे,मान. मदनजी ठेंगणे , सु. वि. साठे, प्रविण आडेकर, सौ. भारती लखमापुरे , कु.आरती रोडे, मा.तु.खिरटकर,माधव कौरासे,गणेश पेंदोर ,शिरीष दडमल, दीपक शिव सर,माधव चाफले,अनिल पिट्टलवार , शालिक दानव, रमेश भोयर आणि बरेचसे सभासद यांचे कडून कवी गझलकार सुनील बावणे यांच्या प्रथम साहित्यकृती प्रकाशनास्तव वरोरा झाडीबोली शाखेच्या वतीने सन्मानचिन्ह,मानवस्त्र,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कवी सुनिल बाबणे एका ग्रामीण संस्कृतीशी निगडीत असल्याने त्यांच्या कविता व गझलाचे रुपाने ते ग्रामीण सर्वसामान्यांच्या व्यथा समाजासमोर आणण्याचे बहारदार कार्य करताहेत.त्यांच्या रचना संपुर्ण महाराष्ट्रभर आज गाजताहेत.ते सुरुवातीच्या लिखाणापासून आजवर ‘निल’ या नावाने , वरोरा झाडी बोली शाखेशी संलग्नित आहे त्यांचे बरंच लिखाण आणि सादरीकरण, झाडी साहित्य प्रवास वरोरा शाखेच्या यशस्वी वाटचालीचा भाग बनलेला आहे.मंडळाद्वारा यावर्षी घेण्यात आलेल्या ३२ व्या झाडीबोली साहित्यसंमेलन वरोरा येथे घेतांना नियोजनात्मक दिलेल्या अनेक जबाबदा-यावर त्यांनी मंडळाला सहकार्य केलेले आहे. ते आपल्या वाटचालीस वरोरा झाडीबोली शाखेला अग्रस्थानी मानतात.
या कार्यक्रमाला उपस्थित सर्व साहित्यिक, कवी , रसीक यांनी या काव्यसंग्रहाचे स्वागत केले. आणि कवी सुनील बावणे – निल यांना हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.