सावळी सदोबा येथे उद्यापासून बेमुदत धरणे आंदोलन

Share News

🔹महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन

🔸सावळी सर्कल मधील सर्व बौध्द समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे

✒️यवतमाळ(Yavtmal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

यवतमाळ(दि.22 मार्च) :- सावळी इचोरा सर्कल मधील सर्व बौद्ध बांधवांकडून दि.23 मार्च २०२५ वार रविवार पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सावळी(स) येथे सावळी इचोरा सर्कल मधील सर्व समाज बांधवाकडून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संदर्भात बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

बौद्धगया महाविहाराच्या व्यवस्थापना मध्ये ब्राह्मण महंत घुसले आहेत.१९४९ च्या कायद्यानुसार नऊपैकी ५ ब्राह्मण व्यवस्थापक मंडळावर आहेत. ब्राम्हणांचा धर्म वैदिक मग ते बौद्ध विहारात व्यवस्थापक कसे? मशीद मध्ये मौलवी व्यवस्थापक असतात.चर्चमध्ये पादरी व्यवस्थापक असतात, गुरुद्वारा मध्ये शिख धर्मगुरू व्यवस्थापक असतात,मंदिरामध्ये हिंदू (ब्राम्हण ) व्यवस्थापक असतात,बौद्धगया महाविहार मध्ये वैदिक महंत व्यवस्थापक कसे? बौद्धगया महाविहार मुक्ती आंदोलन हे घुसखोर ब्राह्मण महंतांना बौद्धगया महाविहाराच्या व्यवस्थापना मधून हाकलून लावण्यासाठी आहे. ब्राह्मण महतांच्या लूटारु वृत्ती विरुद्ध हा संघर्ष आहे. भांडणं ब्राह्मण महंत विरुद्ध बौद्ध समुह असं आहे. या संघर्षात हिंदू धर्मातील कुणाशीही संघर्ष नाही. हा संघर्ष वैदिक धर्म संस्कृती विरुद्ध बौद्ध धम्म संस्कृती असा आहे. मात्र कपटी ब्राह्मण स्वतः नामानिराळे राहून हिंदू समुहाला चुकीची माहिती देतं हिंदू समुहाच्या भावना भडकवित आहेत.कपटी षढयंत्रकारी ब्राह्मण हिंदू लोकांच्या पाठिमागे लपून आपला जीव वाचविण्यासाठी हिंदू लोकांना पुढे करीत आहे.

बौद्ध गया विहारात व्यवस्थापक ब्राह्मण महंत, मलिदा खायला ब्राह्मण आणि लढायला हिंदू असा कुटील डाव ब्राह्मण खेळतं आहेत. वैदिक धर्मीय ब्राह्मणांसाठी हिंदू धर्मातील लोकांनी का लढावे? हा विचार हिंदू धर्मातील समुहाने केला पाहिजे. भारत देशातील सगळ्या मंदिरात पुजारी बनून मलिदा लाटणाऱ्या महतांनी बौद्धगया महाविहार मध्ये सुद्धा मलिदा लाटण्याचा आपला व्यवसाय सुरू ठेवला आहे.बौद्धगया महाविहार मुक्ती आंदोलन हे लूटारु महंताच्या विरुद्ध आहे हे तमाम हिंदू बांधवांनी लक्षात घ्यावे हीच अपेक्षा.

बोधगया इथलं महाबोधी महाविहार, जिथे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, हे स्थळ बौद्ध समुदायासाठी अतिशय महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. दुर्दैवानं, १९४९ च्या बोधगया मंदिर कायदा अंतर्गत, या ऐतिहासिक स्थळाचं व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समुदायाच्या हातात नाही. या कायद्यानुसार, मंदिर व्यवस्थापन समितीमध्ये नऊ सदस्य असतात. त्यापैकी पाच अन्य समाजाचे आणि केवळ चार बौद्ध असतात. ही न्यायिक बाब नाही.हे बौद्ध समुदायाच्या हक्कांवर थेट हल्ला आहे.

महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समुदायाकडे सोपवावं आणि बोधगया मंदिर कायदा १९४९ रद्द करावा. या मागणीसाठी बौद्ध भिक्षू १२ फेब्रुवारीपासून शांतीपूर्ण वातावरणात निदर्शनं करत आहेत. परंतु बिहार सरकारच्या पोलिसांनी निदर्शकांना जबरदस्तीनं काढून त्यांच्या लोकशाही अधिकारांवर गदा आणला आहे.हा केवळ व्यवस्थापनाचा प्रश्न नाही तर, बौद्ध समाजाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीशी संबंधित प्रश्न आहे. बौद्धांना महाबोधी महाविहाराचं पूर्ण अधिकार मिळाले पाहिजेत; जेणेकरून त्यांना त्यांच्या धार्मिक परंपरा आणि विधींचं पालन मुक्त व स्वतंत्रपणे करता येईल.

Share News

More From Author

चंद्रपूर जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख जाहीर

झाडीबोली साहित्य मंडळ स्याका वरोरा यांचे कडून कवी सुनिल बावणे सन्मानित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *