चंद्रपूर जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख जाहीर

Share News

🔹रवींद्र शिंदे व संदीप गिऱ्हे यांच्याकडे जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभांची जिल्हाप्रमुख पदाची जवाबदारी

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.20 मार्च) :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे नियुक्त्यांमध्ये रवींद्र शिंदे यांची वरोरा, भद्रावती, राजुरा आणि चिमूर विधानसभा कार्यक्षेत्राकरीता जिल्हाप्रमुख पदी तर संदीप गिऱ्हे यांची चंद्रपूर, बल्लारपूर आणि ब्रह्मपुरी विधानसभा कार्यक्षेत्राचे जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. पूर्व विदर्भाकडे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे विशेष लक्ष आहे. त्यांनी पूर्व विदर्भातील पदाधिकारी व शिवसैनिकांशी चर्चा करुन स्वतः हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.

रवींद्र शिंदे हे सहकार व राजकीय क्षेत्रात मागील कित्येक वर्षांपासून कार्यरत होते. त्यांची सहकार क्षेत्रात चांगली पकड आहे. कोरोना काळापासून राजकीय क्षेत्रात ते अधिक सक्रिय झालेले आहेत. या दरम्यान शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने त्यांनी पक्षसंघटन स्तरावर चांगले कार्य केले आहे.

जिल्ह्यात पक्षासोबत सदैव प्रामाणिक राहून त्यांनी कार्य केले. त्यांनी सहकारी संस्थेच्या निवडणुका, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका, ग्रामपंचायत निवडणूका यात पक्षाला विजयश्री मिळवून दिली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या निर्णयासोबत राहून वरोरा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी सोबत राहिले. पक्षाकरिता त्यांचे समर्पण व प्रामाणिक भाव याचे फळ म्हणून त्यांना पुन्हा एकदा चिमूरसह वरोरा, राजुरा विधानसभांची जवाबदारी जिल्हाप्रमुख पदाच्या निमित्ताने दिली आहे.

जिल्हाप्रमुख पदाच्या माध्यमातून वंदनीय हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन ८०% समाजकारण व २०% राजकारण या तत्वानुसार समाजकारणावर भर देत पक्षाची धुरा सांभाळणार असल्याचे रवींद्र शिंदे यांनी म्हटले आहे. सोबतच पक्ष संघटनेवर भर देऊन जुन्या व नविन शिवसैनिकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

रवींद्र शिंदे व संदीप गिऱ्हे यांच्या या निवडीकरीता सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Share News

More From Author

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मिळणार क्रीडा क्षेत्राला बळकटी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *