🔸दाताळा येथील वीर बाबुराव शेडमाडे स्टेडियमच्या क्रीडा संकुलाला मिळणार १३७ कोटींची प्रशासकीय मान्यता
🔹आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला क्रीडामंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
✒️ मुंबई (Mumbai विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
मुंबई( दि.20 मार्च) :– राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले असून, चंद्रपूर जिल्ह्यातील दाताळा येथील वीर बाबुराव शेडमाडे स्टेडियमच्या अत्याधुनिक क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी १३७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात आ.मुनगंटीवार यांच्या मागणीला क्रीडामंत्री ना. दत्तामामा भरणे यांनी बैठकीत सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरीसाठी आश्वस्त केले. दाताळा येथील होणारे संकुल क्रीडाक्षेत्रातील खेळाडूंना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास यावेळी आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
राज्याचे क्रीडामंत्री श्री. दत्तामामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात विशेष बैठक पार पडली. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रमूख उपस्थिती होती यावेळी दिग्गीकर अप्पर मुख्य सचिव, सोनावणे क्रीडा आयुक्त ,सुधीर मोरे सहसंचालक तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश फुंड,संजय सबनीस, शेखर पाटील क्रीडा विभागातील अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत प्रस्तावित दाताळा येथील वीर बाबुराव शेडमाके स्टेडियमच्या क्रीडा संकुलाच्या संपूर्ण आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. अत्याधुनिक क्रीडा सुविधांसह हे संकुल जिल्ह्यातील युवा खेळाडूंसाठी एक प्रेरणादायी केंद्र ठरेल.चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू या संकुलाच्या माध्यमातून ऑलिम्पिकसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करू शकतील असा असा विश्वास बैठकीत राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.आ.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला बैठकीदरम्यान क्रीडामंत्री श्री. दत्तामामा भरणे यांनी या सकारात्मकता दाखवत दाताळा येथील वीर बाबुराव शेडमाडे स्टेडियमच्या क्रीडा संकुलाला प्रशासकीय मान्यता लवकरच दिली जाईल, असे आश्वासन दिले. क्रीडा क्षेत्राचा विकास हा राज्य सरकारच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
*क्रीडा संकुलामुळे स्थानिक खेळाडूंना नवी संधी*
चंद्रपूर जिल्ह्यातील दाताळा येथे प्रस्तावित क्रीडा संकुलामुळे स्थानिक तसेच जिल्ह्यातील खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. येथे अॅथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, कुस्ती, कबड्डी आणि विविध ऑलिम्पिक खेळांसाठी आवश्यक तांत्रिक व भौतिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील युवा खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळणार आहे. भविष्यातील ऑलिम्पियन आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्यासाठी हे संकुल अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.
या निर्णयामुळे क्रीडाप्रेमीमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवा उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.