✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)
वरोरा : – वरोरा तालुक्यातील माढेळी येथिल पारस कॉटन जिनिंग ला मंगळवारी दु १.३० वा चे सुमारास अचानक आग लागली. अंदाजे ६८लाख रुपयांच नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सविस्तर वृत्त असे की, शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कापूस गाडी मधून रिकामा करुण निघुन जातात. त्या कापसाला ट्रक्टर लोडर च्या साहय्याने गंजी लावण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक ट्रॅक्टर लोडर च्या बॅटरी मध्ये शार्टसक्रीट झाले. त्यामुळे या गंजीला आग लागली. आग लागताप येथिल मजूरांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले.
याची सूचना लगेच अग्निशामक दलाला देतांच जी एम आर, वर्धा पॉवर कंपनी आणि नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडया येताच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले. तोपर्यंत अंदाजे १ हजार क्विंटल कापूस आगे तो भस्म सात झाला होता. यामध्ये ट्रॅक्टर चे चालक केशव शर्मा, वय 32 वर्ष याच्या उजव्या हाताला दुखापत झाली.