🔹शेकडो भाविक घेतात महाप्रसादाचा लाभ
✒️भद्रावती(Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
भद्रावती(दि.12 मार्च):- विदर्भात सर्वात मोठे व जागृत असलेले भद्रावतीचे कुलदैवत भद्रनाग मंदिर हे विदर्भात अतिशय सुप्रसिद्ध आहे. या मंदिरात नवस बोलल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता भाविकांमध्ये आहे. या मंदिरात मंदिर प्रशासनातर्फे दररोज भाविकांसाठी महाप्रसाद वितरित करण्यात येतात. दररोज महाप्रसाद वितरित करणारे हे मंदिर कदाचित विदर्भातील एकमेव मंदिर होय.
भद्रनाग मंदिराची ट्रस्ट ची स्थापना झाल्यापासून विश्वस्त तर्फे मंदिरात भाविकांसाठी अनेक सुविधा निर्माण करण्यात आले आहे. विदर्भातील हे सर्वात मोठे आणि प्राचीन नागमंदीर असल्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे .मंदिरात दररोज दर्शनासाठी आलेल्या भाविकांना एक वेळ तरी महाप्रसाद मिळावा यासाठी मंदिरात विश्वस्तां तर्फे दररोज महाप्रसाद वितरणाची व्यवस्था करण्यात आली असून .याचा लाभ शेकडो भाविक घेत असतात .सदर मंदिरात नागपंचमी व महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असते यापैकी नागपंचमीची यात्रा ही सर्वात मोठी यात्रा होय .या दिवशी विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील भाविक या मंदिरात भद्रनाग स्वामीच्या दर्शनासाठी व बोललेला नवस फेडण्यासाठी येथे येत असतात.
त्यामुळे वर्षभर मंदिरात भाविकांचा रास्ता असतो. दूरवरून मंदिरात येणाऱ्या भाविकांना एक वेळचे अन्न मोफत मिळावे यासाठी शेगाव आणि शिर्डीच्या धर्तीवर येथे दररोज सकाळपासून तर सायंकाळी चार च्या दरम्यान मोफत भोजनदान दिल्या जाते. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या गोरगरीब भाविकांची सुविधा होते. एखाद्या भाविकाला जर अत्यल्प खर्चात भोजनदान करायचे असल्यास अत्यल्प दान घेऊन त्यांना भोजनदान करण्याची व्यवस्था विश्वस्तान तर्फे करण्यात आली आहे. याशिवाय येथील ट्रस्ट तर्फे भाविकांसाठी अनेक सुविधा पुरविण्यात आले आहे. भद्रावती ही पर्यटन नगरी आहे व येथे अनेक ऐतिहासिक व पुरातन स्थळे आहेत. त्यामुळे भाविक तथा पर्यटकांनी एक वेळ तरी भद्रावती शहराला भेट देण्याची आवश्यकता आहे.
भद्रनाग मंदिर येथे येणाऱ्या भाविकांसाठी विश्वस्तानतर्फे पूर्ण सुविधा कशा मिळतील यासाठी सतत प्रयत्न केल्या जात असून यापुढेही भाविकांच्या सुविधेत वाढ होईल असे प्रयत्न सातत्याने केले जात आहे या पार्श्वभूमीवर विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे मंदिरात नेहमी स्वागत आहे.
*डॉ. रमेश मिलमिले*.
अध्यक्ष भद्रनाग स्वामी विश्वस्त मंडळ, भद्रावती.