✒️मूल(Mul विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
मूल(दि.28 फेब्रुवारी) :-
आज दिनांक २८ फेब्रुवारी रोज शुक्रवार ला माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रिमा कांबळे अध्यक्ष मन्हून तर विशेष अतिथी म्हणून भारती मोटघरे मुख्याध्यापिका शरद चंद्र पवार विद्यालय भेजगाव, नरेश कुमार बोरीकर अध्यक्ष फिनिक्स अकाडॅमी चंद्रपूर ,अशपाक सय्यद उपमुख्याध्यापक माउंट कॉन्व्हेन्ट मूल, दुष्यंत गणवीर ज्युनिअर कॉलेज इन्चार्ज माउंट कॉन्व्हेन्ट मूल हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना विज्ञान चे महत्व पटवून दिले सोबतच नवीन तंत्रज्ञानाची मदत घेऊन भारताला विकास करण्याची गरज आहे हे सांगितले.
या निमित्ताने शाळेत विज्ञान प्रदशनी चे आयोजन करण्यात आले.
यामध्ये नर्सरी पासून तर इयत्ता ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी एकल किंवा समूह मध्ये प्रतिकृती बनवून आपापल्या शोधाचे महत्त्व सांगितले.
स्पर्धेचे परीक्षण दुष्यंत गणवीर , योगेश चौधरी , चैताली बावणे, ऐश्वर्या गणवीर यांनी केले.
कार्यक्रम चे संचालन जान्हवी वासेकर, संस्कृती गावतुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे उपमुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक अशपाक सय्यद यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विज्ञान शिक्षक अशपाक सय्यद , दुष्यंत गणवीर,चैताली बावणे, ऐश्वर्या गणवीर, पलक काळे ,सौरभ गेडाम व इतर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.