भुकेलेल्याच्या अन्नाची तजवीज अन् गाडगेबाबा माकोण्यात

Share News

🔹माकोना गावाला दिली होती गाडगेबाबांनी भेट

🔸माकोना ते रामदेगी केला प्रवास 

चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.26 फेब्रुवारी) :- महाराष्ट्रातील परिवर्तन वादी, स्वच्छतेचे पुजारी, अंधश्रद्धा निर्मूलन व शिक्षणाचे महान पुजारी म्हणून ज्यांना ओळखले जाते असे संत म्हणजे गाडगेबाबा. गाडगेबाबा आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात चिमूर तालुक्यातील माकोना गावातील मालगुंजार मेघेश्याम भाऊजी कारेकर यांच्या विनंतीवरून डिसेंबर १९५६ मध्ये माकोना या छोट्याश्या गावत आले होते.

      माकोना येथील वारकरी पंथाचे असलेले मेघेश्याम कारेकर यांची गाडगेबाबा यांच्याशी भेट झाली होती तेव्हा त्यांनी गाडगेबाबा यांना माकोना गावात येण्याची विनंती केली तेव्हा गाडगेबाबा यांनी तिकडे अन्नाविना माणसं मारत आहेत तिकडे येऊन काय करू व तु काय देणार असा प्रश्न केला तेव्हा गहू, ज्वारी घेऊन जा असे बोलले व गाडगेबाबा यांना एक व्याघणं गहू देण्यात आले त्यानंतर गाडगेबाबा हे माकोना गावात आले व रामदेगी येथे कीर्तन करून मुंबई ला रवाना झाले होते.

    गाडगेबाबा यांच्या आगमनाने माकोना गावात उत्सहाचे वातावरण संचारले होते गाडगेबाबा गावात आल्यानंतर त्यांनि गावातील मंदिरातील पारावरच विसावा घेत गावातील इतर समाजातील जेवण आणण्याचे सांगून सर्व जेवणाचे मिश्रण करून सर्वाना वाटून दिले व रामदेगी येथे कीर्तणासाठी रवाना झाले होते.

—————————-

सिरा पुरीचे जेवण नाकारले 

  गाडगेबाबा माकोना गावात मेघेश्याम कारेकर यांच्या विनंतीवरून आले होते त्यामुळे त्यांचे औक्षण व जेवणासाठी सिरा, पुरी करण्यात आली मात्र गाडगेबाबा यांनी सीरा, पुरीचे जेवण नाकारून गावातील महारवाड्यात घराघरात बनवलेलं जेवण आणून देण्याचे सांगितले त्या सर्व जेवणाचे मिश्रण करून सहकार्यना व नागरिकांना वाटून दिले.

———————————

   गाडगेबाबा यांना माकोना गावात येण्याची विनंती आमच्या वडिलांनी केली होती त्यामुळे गाडगेबाबा माकोना गावात आले होते आल्यावर ते मंदिरात काही काळ थांबले नंतर सहकार्यना जेवण देऊन ते रामदेगी येथे कीर्तनाला रवाना झाले.

   हनुमंत कारेकर 

माकोना, ता. चिमूर. जी.चंद्रपूर.

Share News

More From Author

आ.करण देवतळे यांचा सत्कार 

वरोरा बाजार समितीत होणार मोठा बदल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *