✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.20 फेब्रुवारी) :- संभाजी राजे यांच्या जिवनाची यशोगाथा सांगणारा छावा चित्रपट महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रसिध्द झाला असून सदर चित्रपटातून संभाजी राजे यांच्या यशोगाथेतून युवकांना तसेच सर्व सामान्यांना ऐतिहासिक महाराष्ट्र व तत्कालीन शुर राजांचा वारस्याची माहिती सर्व सामान्यांना व्हावी या करीता छावा हा चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करावा अशी मागणी खासदार धानोरकर यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.
संपुर्ण देशात प्रसिध्द झालेला छावा ह्या चित्रपटातून संभाजी राजे यांच्या जिवनाची यशोगाथा तसेच ऐतिहासकालीन महाराष्ट्रातील परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे. विपरीत परिस्थितीतील संभाजी राजे यांनी केलेले कार्य व आपल्या राज्यातील जनतेची घेतलेली काळजी, हि संपुर्ण यशोगाथा सर्व सामान्य नागरीकांना बघता यावी व युवा पिढीला यातून प्रेरणा मिळावी व विद्यार्थ्या मध्ये देशभक्ती निर्माण व्हावी. तसेच सर्व सामान्यांना ऐतिहासीक महाराष्ट्राची माहिती व्हावी याकरीता सदर चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्याची विनंती खासदार धानोरकर यांनी ज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात स्वतः ते मंत्री महोदयांशी वार्तालाप करुन विनंती करणार असल्याचे त्यानी पाठविलेल्या प्रसिध्दी पत्रकातून कळविले आहे.