✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.17 फेब्रुवारी) :- नेहरु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव बूज येथे नुकताच वर्ग दहावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभ व श्री सागर पाटील यांचा उत्तम कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यात विद्यार्थांना काॅफीमुक्त परिक्षा केंद्र याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच उत्तम शिक्षणासाठी अभ्यास करणे गरजेचे आहे. विद्यार्थांनी परीक्षेची पुर्वतयारी कशी करायची पेपर कसा सोडवायचा याचे मार्गदर्शन करण्यात आले.
सागर पाटील यांनी शेगाव बिटच्या उत्तम कार्याची माहीती सांगुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक ढाकुणकर सर तथा प्रमुख पाहुने सत्कार मुर्ती सागर पाटील सर केंद्र प्रमुख शेगाव बीट, शंभरकर, चांगले, हिवरकर, मानकर, मत्ते, कन्नाके, आसुटकर, कडुकर यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कर्यक्रमाला शाळेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु रेनुका रोडे, कु. गितांजली कोटकर तर आभार कु सुचंता गायकवाड ह्यांनी केले. विद्यार्थांना अल्पोहार देऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला.