✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.10 फेब्रुवारी) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या पोहा येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.यावेळी पुज्यनिय भदंत ज्ञानज्योती महस्थविर संघनायक, संघरामगिरी आणि भिख्खू संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .त्यानंतर 1 वाजेपासून 2 वाजेपर्यंत पूज्यनिय भदंत ज्ञानज्योती महा स्थविर संघनायक संघरामगिरी यांनी उपस्थित सर्व उपासकांना धम देसणा दिली.
3 वाजता पासून मा. प्रा.संजय बोधे सर यांच्या अध्यक्षतेखाली माता रमाई यांची जयंती तथा समाजातील सेवानिवृत्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यात मा.प्रा. कवडुजी पेटकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.बाबाजी थुलकर सेवानिवृत्त शिक्षक, राजुभाऊ थुलकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.प्रा.त्रयबक पेटकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
प्रा.शिवरमजी रोडे ,देवाजी लभाने सेवा निवृत्त कॅशीअर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मा. शांतारामजी पेटकर यांनी बौद्ध विहारा करिता भूमिदान दिली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.झेड. ए.वाघमारे सेवानिवृत्त मॅनेजर महाराष्ट्र बँक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पोहा येथील अनेक उपासक उपसिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.