✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.9 फेब्रुवारी) :- माढेळी नागरी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरा या गावातील नागरिकांना जाण्या येण्यासाठी योग्य रस्ता नाही तसेच स्मशानभूमीला जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळे गावातील समस्या मार्गी लावाव्या यासाठी वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांना गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
वरोरा तालुक्यातील नागरी गट ग्रामपंचायत अंतर्गत तीन किलोमीटर अंतरावर हिवरा हे आदिवासी बहुल गाव असून या गावाला जाणे-येणे करण्यासाठी योग्य रस्ता नाही या गावातून नागरी येथे व हिंगणघाटला शिकण्यासाठी तसेच बाजारपेठ विविध कारणासाठी नागरिकांचे येणे जाणे असते .
परंतु या गावाला जाण्यासाठी अत्यंत खराब रस्ता तसेच नाल्याचे बांधकाम नसल्यामुळे अगोदर चालू असलेली एसटी महामंडळाची बस काही दिवसापूर्वी बंद करण्यात आली त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो तसेच स्मशानभूमीसाठी योग्य रस्ता नाही.
त्यामुळे पावसाळ्यामध्ये येथील नागरिकांना स्मशानभूमीपर्यंत अंतिम क्रिया कार्यक्रम करण्यासाठी पोहोचणे अशक्य होत असल्यामुळे प्रेताची अंतिम क्रिया मध्यंतरी कुठेही करावी लागते या सर्व गोष्टीमुळे येथील गावातील नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती उदासीन भावना निर्माण झाली आहे त्यामुळे या गावातील समस्या मार्गी लावाव्या यासाठी निखिल चौधरी व गावकऱ्यांनी आमदार देवताळे यांना निवेदन सादर करून ह्या समस्या प्राधान्य सोडवावे अशी विनंती केली आहे.