🔸ओळख पटविण्याचे पोलीसांचे आवाहण
✒️भद्रावती(Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
भद्रावती (दि.8 फेब्रुवारी) :- भद्रावती तालुक्यातील चिरादेवी गावाजवळील रेल्वेलाइनवर एक महिण्यापुर्वी रेल्वेने कटून मृतावस्थेत आढळलेल्या अनोळखी इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही.
सदर ओळख पटविण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन भद्रावती पोलिसांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.१२ जानेवारीला सदर युवक मृतावस्थेत आढळला होता. हा इसम अंदाजे चाळीस वर्षाचा असुन सडपातळ बांधा आहे.त्याच्या उजव्या हाताच्या बोटात अंगठी आहे.
व त्याने कांग्रेस पक्षाच्या प्रचाराचे टिशर्ट घातलेले आहे.भद्रावती पोलीसांनी याबाबत मर्ग दाखल केला असुन मृतकाची ओळख पटविण्यासाठी पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.यासाठी भद्रावती पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.