🔸जनसेवा ही स्वार्थासाठी नसून जनकल्याणासाठी…अभिजित कुडे
✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.8 फेब्रुवारी) :-
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे यांच्या सौजन्याने HelpAge india व दत्ता मेघे मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिटय़ूट सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे नागरी येथे आयोजन करण्यात आले होते त्या शिबिरातील रूग्णांना मोफत शस्त्रक्रिया साठी सावंगी येथे पाठविण्यात आले.
शिवसेना प्रमुख, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 70 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या प्रमाणे कार्य करत आहे. जिल्हाप्रमुख रविन्द्र शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख रोहण कुटेमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व विधानसभा प्रमुख युवासेना अभिजीत प्रभाकरराव कुडे यांच्या तर्फे मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले. दत्ता मेघे मेडिकल व रिसर्च इन्स्टिटय़ूट कॉरडीनेटर मुरलीधर उमाटे,सामाजिक कार्यकर्ते अमोल भाऊ HelpAge India सीनियर एक्झिक्युटीव्ह रशेदा शेख यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या माध्यमातून गरजू जेष्ठ निराधारांच्या सेवेची संधी मिळाली हे भाग्य लाभले असून नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असा आधार अभिजित कुडे यांनी दिला. नागरी व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. अभिजीत कुडे यांच्या कार्यास शुभेच्छा असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे उद्गार जेष्ठ नागरिकांनी काढले. जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे
मात्र ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे असे प्रतिपादन अभिजित कुडे यांनी केले . जेष्ठ नागरिकांना शस्त्रक्रिया साठी रवाना करण्यात आले त्यांच्या चेहर्यावर चा आनंद यातच समाधान आहे यावेळी रोशन भोयर, विजय कुडे उपस्थित होते.