नाफेडची सोयाबीन खरेदी सुरू करा. कृ. ऊ. बा. स. माजी सभापती राजुभाऊ चिकटे यांची मागणी

Share News

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.8 फेब्रुवारी) :- वरोरा तालुक्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सोयाबीन पीक हंगाम संपून अनेक शेतकऱ्यांच्या घरी आज ही सोयाबीन हे हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या घरामधे सोयाबीन साठवलेले आहे सोयाबीन पिकाचे भाव वाढेल व सोयाबीन विकू या आशेवर शेतकरी आहे परंतु सोयाबीन पिकाचे भाव वाढत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे . शिवाय ग्रामीण भागात भुरटे दलाल सोयाबीन खरेदी करणारे दुकानदार हे शेतकऱ्यांना दिशाभूल करून त्यांच्याकडून कवडी मोलाने सोयाबीन खरेदी करीत असल्याचे दिसत आहे .त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. 

      या पूर्वी येथील शेतकऱ्यांनी नाफेड मध्ये 1978 शेतकायानी नोंद केली आहे त्यात 1520 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला परंतु यात 450 शेतकरी आज ही नाफेड लाभ पासून वंचित आहे . नाफेड मध्ये सोयाबीन ल 4892 रू . हमी भाव आहे. करिता शेतकऱ्यांच्या हितासाठी नाफेड सोयाबीन खरेदी सुरू करण्यात यावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा चे माजी सभापती श्री राजूभाऊ चिकटे यांनी केली आहे.

शेतकऱ्यांचे मरण हे सरकारचे धोरण याच उद्देशाने सरकार शेतकऱ्यांचे हाल करताना दिसत आहे एकीकडे नाफेडची सोयाबीन खरेदी सरकारने बंद केल्यामुळे शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट कोसळलेले आहे त्यामुळे तात्काळ नाफेडची सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी राजुभाऊ चिकटे यांनी प्रशासनाकडे केलेली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात सोयाबीनचे पिके घेतली आजही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये महागडी खते,बी, बियाणे औषधी वापरून रब्बी हंगामात सुद्धा सोयाबीन पिके लागवड करण्यात आलेली आहे, मात्र खाजगी व्यापारी आजही अनेक शेतकऱ्यांकडून एक हजार रुपयाने कमी किमतीत सोयाबीन खरेदी करत असुन सोयाबीनला योग्य प्रमाणात भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

एकीकडे नाफेडची खरेदी 4892 रूपये असून खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची पिडवणूक करताना दिसत आहे, तसेच सरकारची उदासीन धोरणामुळे महागडी खते, औषधी, वापरून शेतीकरीता कर्ज काढून खर्च सुद्धा निघणे शेतकऱ्यांना अवघड झालेले आहे, त्यामुळे तात्काळ नाफेडची 4892 रुपयांची सोयाबीन खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी सभापती राजूभाऊ चिकटे यांनी प्रशासनाकडे केलेली आहे.

Share News

More From Author

आरोपीकडून चोरीच्या १३ मोटारसायकल जप्त 

नेत्र शस्त्रक्रिया साठी रुग्णांना रुग्णालयात रवाना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *