आरोपीकडून चोरीच्या १३ मोटारसायकल जप्त 

Share News

🔸वरोरा पोलिसांची कारवाई

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.8 फेब्रुवारी) :- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, वरोरा तसेच इतर ठिकाणावरून मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात वरोरा पोलिसांना यश आले आहे. आरोपीने विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या १३ सायकल मोटरसायकल जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे.

वरोरा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक ‌ चोरी गेलेल्या मोटर सायकलची चौकशी करीत असताना. गुरुवार दि. ६ फेब्रुवारी‌ रोजी मोटारसायकल चोरी करणारा प्रफुलचंद वामनराव जोगी वय ४५ वर्ष राह. मार्डा ता. वरोरा जि. चंद्रपुर हा वरोरा, भद्रावती व इतर ठीकानी मोटारसायकल चोरी करुन तिचे स्पेअर पार्टची अदला बदली करुन मोटार सायकल चोरी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता मोटरसायकल चोरीची प्रकरणे उघडकीस आली.

आरोपीच्या ताब्यातुन प्रमाणे १३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. यात पो. स्टे. वरोरा अप क्र. ६३८/२०२४ भारतीय न्याय सहीता २०२४ या गुन्हा मधील स्लेन्डर प्लस,बिना नंम्बरची प्लेटची व रंग काळा , दुसऱ्या गुन्ह्यातील स्लेन्डर प्लस बिना नंम्बरची प्लेटची रंग काळा , मोटारसायकलची दोन नंबर प्लेट , हिरो होन्डा स्लेन्डर कंम्पनीची स्प्लेंडर गाडी क्र.एम एच३४ एएच-५५३५ ,हिरो फँशन प्रो. कंम्पनीची मोटार सायकल खोटी नंम्बर प्लेट एम एच एन-८५०९ खरी नंम्बर प्लेट क्र. एम एच ३४ वाय ०४०३ , हिरो स्लेन्डर प्लस खोटी नंम्बर प्लेट असलेली मो. सा.क्र एम एच ३४ एडी ९५७५ , हिरो स्लेन्डर प्लस खोटी नंबर प्लेट क्र. एम एच ३४एबी ८५७५ , हिरो फैशन खोटी नंबर प्लेट क्र. एम एच ३४एम८४५१ खरा नंबर क्र. एम एच ३२ एम ८४५१ असा एकुन दोन लाख साठ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  अप क्र. ४१०/२०२४ कलम ३७९ या गुन्हात नमुद आरोपीच्या ताब्यातुन हिरो स्लेन्डर मो. सा. खोटी नंम्बर प्लेट क्र. एम एच ३४ डब्ल्यू ‌७४०० खरा नंम्बर एम एच ३४ एएन ७९८५, हिरो स्लेन्डर मो. सा. क्र. खोटी एम एच ३१ बीजी ५९५३ , चुकीचा नंबर प्लेट लावलेली हिरो स्लेन्डर मो. सा. क्र. एम एच ३४ एसी २४४७ , हिरो होन्डा स्लेन्डर प्लस क्र. एम एच ३४ एसी २६०९ , टीव्हीस कंम्पनीची मो. सा. क्र. एम एच २९ यु ९३०४, फैशन कंम्पनीची मो. सा. क्र. एम एच ३४ डब्ल्यू ४०२४ असा एकुण एक लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही अपराध क्रमांकानुसार

 १३ नग मोटारसायकल ची एकूण किंमत पाच लाख 44 हजार दोनशे रुपये चा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला. आणि आरोपीला अटक करुन कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक सुदर्शन , अप्पर पोलीस अधिक्षक रीना जनबंधू, सहायक पोलीस अधिक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांचे उपस्थीतीत डि.बी. प्रमुख दिपक ठाकरे, पो. स्टाँप दिलीस सुर, मोहन निषाद, अमोल नवघरे, विशाल राजुरकर, संदिप मुळे, महेश गावतुरे ,मनोज ठाकरे, संदिप वैद्य यांनी केली आहे.

Share News

More From Author

शेतकऱ्यांनी दिले मुख्यमंत्री यांना समस्यांचे निवेदन

नाफेडची सोयाबीन खरेदी सुरू करा. कृ. ऊ. बा. स. माजी सभापती राजुभाऊ चिकटे यांची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *