शेतकऱ्यांनी दिले मुख्यमंत्री यांना समस्यांचे निवेदन

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.7 फेब्रुवारी) :- आज महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्यासाठी विविध उपाय योजना आणत असून त्या फक्त कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी वरोरा येथील तहसीलदार श्री योगेश कौटकर यांच्या मार्फत दि 1) दि 1मार्च 2021 नंतर डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विज जोडणी करण्याबाबत 

2) मुख्यमंत्री यांनी निवडणुकीत दिलेले कर्जमाफिचे आश्वासन पूर्ण करण्याबाबत 

3)मागील वर्षीचा कपाशी वरील पीक विमा तसेच चालू वर्षातील खरीप हंगामातील पीक विमा शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्याबाबत 

4) नाफेड ची सोयाबीन खरेदी मुदत वाढविण्यात यावी तसेच भावामधील तफावत म्हणून शेतकरी यांना प्रति क्विंटल पाचशे रुपये बोनस म्हणून देण्याचे करावे 

आणि 

5) सन 2024-25मधील पूर्ण हंगाम होईपर्यंत cci ची कापूस खरेदी सुरु ठेवण्याबाबत 

6)तसेच गरजू शेतकरी यांना तात्काळ नवीन विज जोडणी साठी डिमांड देण्यात बाबत 

तसेच वरील विषय सर्व शेतकरी हिताचे असून सदर विषयाने शेतकरी यांच्यावर खूप मोठया प्रमाणात अन्याय होत आहे तसेच आत्महत्या करण्याची वेळ आली आहे तरी आपणास शेतकरी निवेदन मिळताच आठ दिवसात शेतकरी यांना न्याय देण्यात यावा अश्या मागण्या घेऊन शेतकरी नेते श्री किशोर डुकरे यांच्या नेतृत्वामध्ये राज्याचे ऊर्जामंत्री, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी साहेब यांना दिले तर प्रतिलिपी मध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना देण्यात आले.

यावेळी तालुक्यातील शेतकरी, श्री पुष्पाकर खेवले, श्रीकृष्ण देवतळे, संदीप वासेकर, महेंद्र गारघाटे , शुभम भुते, जितेंद्र गाढवे, जितेंद्र देठे, विनोद उमरे, अमोल वासेकर, राहुल दारुंडे, अरुण देठे, लक्ष्मण आसुटकर, गोपाल निब्रड, पवन खारकर, प्रमोद वडस्कर यादी शेतकरी निवेदन देताना हजर होते.

Share News

More From Author

भरधाव दुचाकी उडान पुलाच्या भिंतीला धडक ; एकाचा जागीच मृत्यू दोन गंभीर

आरोपीकडून चोरीच्या १३ मोटारसायकल जप्त 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *