✒️शिरीष उगे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती(दि.6 फेब्रुवारी) :- तिघेजन बसून भरधाव दुचाकी उडान पुलाच्या भिंतीला जोरदार धडकल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा घटनास्थळीत मृत्यू झाला. असून दोघे युवक गंभीर जखमी झाले आहे. सदर घटना दि.५ बुधवार ला रात्री ११ वाजता शहरातील हायवे वरील उडान पुलाजवळ घडली. जखमी दोन्ही युवकांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.
अमोल भिंगारदिवे वय २२, सुजल बहादे व लहू धोटे हे तीन युवक नंबर प्लेट नसलेल्या एका काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीने शहरातील पंचशील नगरातून हायवे कडे भरधाव वेगाने जात असताना सदर दुचाकी उडान पुलाच्या भिंतीला आदळली.
या अपघातात अमोल भिंगारदिवे या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सुजल बहादे व लहू धोटे हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले, मृतक ला ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे, शवविच्छेदन साठी पाठवण्यात आले. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.