🔸श्रीलंका येथे होणार 50 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा
🔹भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेला रवाना
✒️शिरीष उगे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती(दि .5 फेब्रुवारी) :- श्रीलंकेतील कोलंबो येथे होणाऱ्या 50 प्लस लेदर बॉल वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेसाठी भद्रावतीच्या संदीप पंजाबराव शिंदे या खेळाडूची भारतीय संघात निवड झाली आहे.
9 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान सदर स्पर्धा श्रीलंकेच्या कोलंबो येथे होणार असून भारतीय संघ दि. 5 फेब्रुवारीला श्रीलंका येथे रवाना झाला आहे.
संदीप पंजाबराव शिंदे हा भद्रावती च्या लक्ष्य क्रिकेट फाउंडेशन चा खेळाडू आहे. काही वर्षा पूर्वी सोळा वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाच्या शिबिरामध्ये त्याची निवड झाली होती. परंतु पायाच्या दुखापतीमुळे तो ती स्पर्धा खेळू शकला नव्हता. परंतु हिम्मत न हारता व अधिक जोमाने सराव करून त्याने अखेर भारतीय क्रिकेट संघात सहभागी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले.
संदीप शिंदे यांच्या भारतीय संघातील निवडीबद्दल स्थानिक लक्ष्य क्रिकेट फाउंडेशन चे खेळाडू व भद्रावती बॅडमिंटन क्लबचे खेळाडू यांच्यातर्फे जे. के . पॅलेस येथे संदीप शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सचिन सरपटवार, सत्कारमूर्ती संदीप शिंदे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, शिवसेना नेते रवींद्र शिंदे ,किसन पत्तीवार हे व्यासपीठावर उपस्थित होते.
क्रिकेट व बॅडमिंटनच्या खेळाडूंनी संदीपच्या क्रिकेट करिअर बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या व पुढील स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.
भारतीय संघात होणारी माझी निवड ही निश्चितच भद्रावतीकरांसाठी तसेच महाराष्ट्रासाठी सुद्धा अभिमानाची बाब आहे. मी जास्तीत जास्त चांगला खेळ खेळून भारतीय संघाला विजयी करून देण्याचा प्रयत्न करील असे मत सत्कार प्रसंगी संदीप शिंदे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन चंद्रकांत खारकर यांनी केले.
याप्रसंगी सुनील महाले, अविनाश पारोधे, जाफर भाई, अजय आसुटकर, समीर बल्की, रोहन कुटेमाटे, अनिल तुराणकर सचिन बाभुळकर, पप्पूभैया बंग, शंभू सिंग, शेखर सिंग, सतीश कवराते,
बंडू भाऊ, नितीन सातपुते, बबलू सारडा, त्यांचे सहित अन्य क्रिकेटपटू व बॅडमिंटनचे खेळाडू उपस्थित होते.