वरोऱ्यात रंगणार खासदार चषक अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धा

Share News

✒️शिरीष उगे वरोरा( warora प्रतिनिधी) 

वरोरा (दि.1 फेब्रुवारी) : – वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा(WSF) व लोक शिक्षण संस्था वरोडा यांचे संयुक्त विद्यमाने स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर स्मृती प्रित्यर्थ अखिल भारतीय खासदार चषक पुरुष व महिला व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक 18 /2/ 2025 ते 20 /2 /2025 दरम्यान लोकमान्य महाविद्यालयाचे मैदानावर करण्यात आलेले आहे.

स्पर्धेकरिता विद्युत प्रकाश झोतातील दोन मैदाने तयार करण्यात आले असून. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे पुढाकाराने होणाऱ्या या स्पर्धेमध्ये पुरुष गटात प्रथम पुरस्कार 1लाख रुपये रोख व चषक, द्वितीय पुरस्कार 75 हजार रुपये रोख व चषक, तृतीय पुरस्कार 50 हजार रुपये रोख चषक, चतुर्थ पुरस्कार 25 हजार रुपये रोख व चषक तसेच महिला विभागात प्रथम पुरस्कार 75 हजार रुपये रोख व चषक, द्वितीय पुरस्कार 50 हजार रुपये रोख व चषक ,तृतीय पुरस्कार 25000रुपये चषक ,चतुर्थ पुरस्कार 15000 रुपये चषक तसेच इतर वैयक्तिक रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये बंगाल ,ओरिसा, तेलंगाना ,तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब ,गुजरात व महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेले नामांकित पुरुष व महिला संघ सहभागी होत आहे.

स्पर्धा यशस्वी करण्याकरिता लोकशिक्षण संस्था वरोडाचे अध्यक्ष प्रा.श्रीकांत पाटील सर यांचे मार्गदर्शनात आयोजन समितीचे अध्यक्ष मानस बाळूभाऊ धानोरकर व वरोरा स्पोर्ट्स फाऊंडेशन वरोरा चे अध्यक्ष गजानन जीवतोडे यांचे नेतृत्वात, आयोजन समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व खेळाडू अहोरात्र परिश्रम घेत आहे.

Share News

More From Author

अवैद्य रेती तस्करी करणाऱ्या तस्कराचा शासकीय अधिकाऱ्याला धक्काबुक्की तसेच शिवीगाळ

जिल्हा परिषदेच्या शेगाव प्राथमिक शाळेची वरोरा तालुक्यात उत्तुंग भरारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *