गावखेड्यातील युवकांनी खेळा मध्ये सहभाग घेऊन राज्यस्तरावर भरारी घ्यावी..ॲड. अनंत रामटेके 

Share News

✒️चिमूर(Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चिमूर (दि.29 जानेवारी) :- तालुक्यातील खानगाव येथील दोन दिवशीय कबड्डी सामना तुर्नामेंटचे उद्घाटन एडवोकेट अनंता रामटेके यांच्या हस्ते पार पडले. या टूर्नामेंट मध्ये विविध वयोगटातील अनेक गावातील स्पर्धक भाग घेणार आहेत. पहिले क्रमांक पटकावणाऱ्या टीमला रुपये 20000, दुसरा क्रमांक पटकविणाऱ्या टीमला रुपये 15000, तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या टीमला रुपये दहा हजार, तर चौथा क्रमांक पटकावणाऱ्या टीमला रुपये 5000 बक्षीस मिळणार आहे. यासोबतच इतर आकर्षक बक्षीस सुद्धा ठेवण्यात आलेली आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन सागर कुमरे , विश्वास गराटे, करण मडावी गणेश कुडमेथे, राजू भलावी व गावी व गावातील इतर तरुणांनी केले. उद्घाटन प्रसंगी बाबा ठावरी, शिवशंकर कुंबरे, किरण ढोक, प्रदीप रामटेके, वामन भोंगळे, सरपंच अर्चना रामटेके, रवी चौके, प्रमोद पाटील व गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

Share News

More From Author

30 जनवरी को सांसद अधि. चंद्रशेखर आझाद का चिमूर में होगा स्वागत-संघारामगिरी मे आझाद करेंगे संबोधित

हेकाड मित्र परिवारातर्फे पालकमंत्र्यांचे जंगी स्वागत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *