तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या हस्ते शेतकरी वनवास शेंडे यांचा सत्कार 

Share News

🔸इतर शेतकऱ्यांना शेतकरी विशिष्ट ओळखपत्र प्रमाणपत्राचे वितरण 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.27 जानेवारी) :- प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने तहसिल कार्यालय भद्रावती येथे मा. तहसीलदार साहेब श्री . राजेश भांडारकर यांचे हस्ते चोरा येथील शेतकरी श्री वनवास धनपाल शेंडे व खोकरी, सागरा, मासळ तसेच परिसरातील अन्य शेतकरी बांधव यांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या ऍग्रिस्टाक योजनेअंतर्गत फार्मर आय डी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

सविस्तर वृत्त याप्रमाणे, केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला ऍग्रिस्टॅक संकल्पनेच्या शेतकरी ओळखपत्र क्रंमाक निर्मिती प्रक्रियेत गतिमान करयासाठी आना शासनाच्या ऍग्रिस्टॅक सुकाणू समितीने दि. ०९/०१/२५ रोजी संपूर्ण राज्यात नागरी सुविधा केंद्र (CSC) ची मदत घेऊन शेतकरी ओळख क्रंमाक निर्मितीचा निर्णय घेतलेला आहे.

शेतक-यांच्या अंत्यंत फायदयाचा असा हा प्रकल्प आहे. यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ दयायचा असेल तर शेतकरी ओळख कंमाक आवश्यक आहे. केंद्रशासन व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक हा मूलभूत घटक राहणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप, तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकयांना मिळवणारी नुकसान भरपाईची अनुदानाची रक्कम याच विशिष्ट ओळखपत्र फार्मर आय डी च्या माध्यमातून मिळणार आहे.

         याच उद्देशाने आज दिनांक २६/०१/२५ ला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने तहसिल कार्यालय भद्रावती येथे ऍग्रिस्टॅक योजने अंतर्गत चोरा येथील शेतकरी श्री वनवास धनपाल शेंडे तसेच परिसरातील अन्य शेतकरी बांधव यांना मा. तहसीलदार साहेब श्री राजेश भांडारकर यांचे हस्ते फार्मर आय डी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाला नायब तहसिलदार श्री .मनोज आकनूरवार साहेब, मा.राहुल राऊत साहेब, मा. सुधीर खांडरे साहेब,पठाण साहेब, मंडळ अधिकारी श्री रमेश आवारी साहेब, तहसील कार्यालय चे कर्मचारी वृंद तसेच तालुक्यातील शेतकरी बांधव तथा प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Share News

More From Author

इथे डॉक्टरांना भेटण्यासाठी पहाटेपासूनच गर्दी होते

तालुकास्तरीय देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ला प्रथम क्रमांक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *