🔸प्रीयदर्शनी सांस्कृतिक सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि .25 जानेवारी) :- जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या चंद्रपूरात प्रथम आगमणा निमित्त आदिवासी संघर्ष कृती समीती आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सांयकाळी 7 वजाता प्रियदर्शनी सांस्कृतीक सभागृहात सदर सत्कार सोहळा पार पडणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या जिल्ह्यातील पहिल्या अधिकृत दौर्यानिमित्त आदिवासी संघर्ष कृती समिती आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने त्यांच्या सत्कारासाठी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात पार पडणार आहे.
पालकमंत्री म्हणून डॉ. प्रा. उईके यांची चंद्रपूरातील ही पहिली अधिकृत भेट असल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या स्थळी आकर्षक सजावट करण्यात आली असून, मोठ्या संख्येने नागरिक, समाजसेवक, आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहतील असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.सत्कार सोहळ्यात पालकमंत्री डॉ. प्रा. उईके यांना चंद्रपूर जिल्ह्यातील विकास कामांवर मार्गदर्शन करणार आहेत सत्कार सोहळा आदिवासी नृत्य, लोकगीते आणि सांस्कृतिक सादरीकरणे यामुळे अधिक रंगतदार ठरणार आहे.
यावेळी विविध सामजिक संघटनाच्या वतीनेही पालकमंत्री यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सत्कार सोहळा नियोजित वेळेनुसार सायंकाळी सात वाजता सुरू होणार असून, चंद्रपूरातील नागरिकांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार आणि आयोजकांनी केले आहे.