निमढेला तलावात पाळीव प्राणी तसेच वन्य पाण्यासाठी 20 टक्के पाणी ठेवावे

Share News

🔸वन्यप्रेमी यांची मागणी

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.24 जानेवारी) :- येथून जवळच असलेल्या निमढेला तलावात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एकही थेंब पाणी राहत नसल्यामुळे पाळीव प्राण्यासहित वन्यजीव पिण्याच्या पाण्यासाठी भटकताना दिसुन येत असतात.

 उन्हाळ्यात जिल्ह्यात सर्वात उष्णतेचे लाट उसळली असुन येत असुन पिण्याच्या प्रश्न नागरिकासहीत सर्वांना पडत असतो, तहान लागली की पाणी नागरिक विकत घेऊन तहान भागवत असतात परंतु वन्यजीव, पशुपक्षी, पाळीव प्राणी यांचे काय असा प्रश्न पर्यावरण प्रेमींना नेहमी पडलेला आहे.

निमढेला,रामदेगी हे विदर्भात नावाजलेलं पर्यटन स्थळ आहे, तलावापासून दोन किलोमीटर रामदेगी असून या ठिकाणी नेहमी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तलाव मध्ये पशुपक्षी, वन्यजीव मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी फिरताना दिसत असून पाण्याअभावी पक्षांना मात्र मुकावे लागत आहे.

नियमानुसार तलावामध्ये 20 टक्के पाणी असणे अनिवार्य असतानासुद्धा तलावात पाणी दोन वष्रे पासुन पाणी राहत नसल्यामुळे वन्यजीव संस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, निमढेला तलावाचे अंतर जवळपास दोन किलोमीटर असून सतत पावसाळ्यामध्ये ओव्हर फ्लो होऊन वाहणाऱ्या तलावात दोन वर्षापासून उन्हाळ्याच्या दिवसात पाणी नसणे हे मात्र कुठेतरी सबंधित प्रशासनकडून जाणून बुजून करण्यात आलेले काम आहे का ? निमढेला तलाव याला अपवाद ठरला आहे या ठिकाणी मार्च महिन्यापासून एकही थेंब पाणी राहत नसल्याने निमढेला तलाव परिसरालीत बफर जंगलातील प्राणी, वाघ,अस्वल,बिबट, मोर रांनगवा,डुक्कर,चितल, ससा, बंदर,भेडकी,आदी जंगली प्राणी तसेच विविध प्रकारच्या पशुपक्षी या तलावर पाण्याकरीता परिसरात दिसून येत असतात तसेच गावातील पाळीव प्राणी सुद्धा या तलावातील पाण्यासाठी अवलंबून असतात गावातील विहीर, बोलवेल यांच्या पाण्याचा साठा उन्हाळ्यात कमी होत असते त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी भटकंती करायला लागते,पाण्यासाठी गावातील पाळीव प्राणी यांना पिण्याच्या पाण्याच्या भटकंती करावी लागत असते.

त्यामुळे वन्य प्राणी आपली शिकार, तहान भागवण्यासाठी गावाकडे नेहमी दिसून येते निमढेला परिसरात एकच मोठा तलाव आहे या तलावावर वन्यजीव तहान भागवत असतात परंतु या तलावाचे पाणी शेती पिकासाठी सोडण्यात येत असल्याने उन्हाळ्यात तलाव कोरडा होतो त्यामुळे राखीव पाणीसाठा ठेऊन शेतीसाठी पाणी सोडण्यात यावे.

जगदीश पेंदाम तरुण पर्यावरणवादी मंडळ.

Share News

More From Author

पोहा येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

अग्नि रक्षक व वन कामगार यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *