🔸पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष ,तात्काळ दारू विक्री बंद करा.. तुलसीदास अलाम
✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा (दि.21 जानेवारी) :- तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात अवैध दारुविक्री, सट्टापट्टी व जुगार चालू आहे मात्र याकडे वरोरा च्या पोलीस प्रसासनाचे अजिबात लक्ष नाही वरोरा शहरात व जामगांव(बु ), बोर्डा , परिसरात अवैध दारुविक्री महापूर, जुगार व सट्टापट्टी होत असल्यामुळे वरोरा तालुक्यातील युवकांचे व विद्यार्थ्याचे खूप मोठे नुकसान होत आहे त्यामुळे अवैध दारुविक्री,सट्टापट्टी व जुगार तात्काळ बंद करावी याची मागणी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे राजकीय कार्यकर्ते व पत्रकार,युवा नेते श्री.तुलसीभाऊ अलाम यांनी केली आहे.
युवक व विद्यार्थी हा व्यसनाधीन होत आहे. खेडोपाड्यात गावा -गावात अवैध दारुविक्री, सट्टापट्टी, जुगार खूप मोठ्या प्रमाणात होत आहे मात्र याकडे वरोरा च्या पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांचे व पोलीस निरीक्षकांचे अजिबात लक्ष नाही अशी परिस्तिती दिसत आहे.. त्यामुळे युवा नेते तुलसीभाऊ अलाम यांनी तात्काळ वरोरा तालुक्यातील व शहरातील जामगांव (बु ) येथे अवैध दारुविक्री, सट्टापट्टी व जुगार तात्काळ बंद करावी अन्यथा पोलीस कार्यालय वरोरा समोर युवकांच्या वतीने भव्य आंदोलन करू असा इशारा दिला आहे.