सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत आरक्षण नाकारणाऱ्या कांग्रेस नेत्यांची राहुल गांधीकडे तक्रार

Share News

🔸सिडीसीसी बैंके समोर कालपासून आमरण उपोषण करणाऱ्या आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती सदस्या कडून पोस्ट कार्डवर मजकूर लिहून पत्र पाठवले

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि .18 जानेवारी) :-

जिल्ह्यात सिडीसीसी बैंकेत 360 पदाच्या नोकर भरतीत मागासवर्गीय एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गाच आरक्षण डावलल असल्याने व खुल्या प्रवर्गातून प्रत्येक उमेदवारांकडून 25 ते 40 लाख रुपये घेऊन 100 कोटींपेक्षा जास्तीचा घोटाळा केला असल्याने आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती द्वारे मागील 2 जानेवारी पासून साखळी आंदोलन व दिनांक 16 जानेवारी पासून आमरण उपोषण सुरु आहे.

दरम्यान कांग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे देशाचं संविधान वाचलं पाहिजे व मागासवर्गीय एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून संसदेत व अनेक कार्यक्रमात बोलत असतात मात्र त्यांच्याच कांग्रेस पक्षाची सत्ता असणाऱ्या सिडीसीसी बैंकेत मागासवर्गीय समाजाला आरक्षण नाकारलं जातं हे संतापजनक असून सिडीसीसी बैंक अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर कारवाई करून बहुजनांचं आरक्षण आबाधित ठेवून नोकर भरती घेण्यास आपल्या कांग्रेस नेत्यांना सांगा असं पत्र आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे सदस्य व बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांनी पोस्ट कार्डवर मजकूर लिहून राहुल गांधी यांना पत्र पाठवली आहे.

आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे सिडीसीसी बैंकेसमोर आमरण उपोषणास बसलेले मनोज पोतराजे यांचा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे, या दुसऱ्या दिवशी किमान 200 कार्यकर्ते आंदोलनस्थळी एकत्र येऊन त्यांनी पोस्ट कार्ड वर राहुल गांधी यांना पत्र पाठवले आहे, यावेळी उपोषणकर्ते मनोज पोतराजे, समन्वयक राजू कुकडे, संजय कन्नावार, नभा वाघमारे, दिनेश एकवनकर, महेश वासलवार, आनंद इंगळे, सूर्या अडबाले, राजू बिट्टूरवार, अभी वांढरे, आशिष ताजने, शशांक काकडे, वैभव मोहाणे, उमंग हिवरे, पारस पिंपळकार, सौरभ ठोंबरे, आकाश येळेकर , साहिल कामडे, यश खोब्रागडे , गौरव भगत व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Share News

More From Author

जिवंत विद्युत तारा तुटल्याने लागली गोट्याला आग

राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सहजीवन कौशल्य व समाजसेवेची आवड निर्माण करणारे केंद्र…आमदार करण देवतळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *