मोफत शस्त्रक्रिया साठी 33 रुग्ण नागपूर साठी रवाना

Share News

🔸जेष्ठ नागरिकांची सेवेचे व्रत अविरत सुरू ठेवणार…अभिजित कुडे

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.17 जानेवारी) :- शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे व HelpAge India यांच्या वतीने माढेळी येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिरातील रूग्णांना मोफत शस्त्रक्रिया साठी महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर येथे पाठविण्यात आले. HelpAge India व महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. आसपासच्या परिसरात 33 रूग्णांना पुढील शस्त्रक्रिया साठी नागपूर रवाना करण्यात आले.

जेष्ठ नागरिकांच्या सेवेचे व्रत अविरत सुरू ठेवणार असून त्यांची सेवा करणे हे भाग्य , कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लगडून जावे असे प्रतिपादन अभिजित कुडे यांनी केले. HelpAge india सीनियर एक्झिक्युटीव्ह रशेदा शेख यांचे कार्य कौतुकास्पद आहेत असून या पुढे देखील यांच्या संयुक्त विद्यमाने असे अनेक शिबीर आयोजित करण्याचा मानस आहे. यावेळी रोशन भोयर, ऋषिकेश वीठाळे, शुभम उरकुडे उपस्थित होते. जेष्ठ नागरिकांच्या चेहर्‍यावरील समाधान व हास्य बघून आनंद होत आहे त्यांचा आशिर्वाद लाभणे हेच भाग्य आहे जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे.

मात्र ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे असे यावेळी अभिजित कुडे यांनी म्हटले. 33 रूग्णांना यावेळी महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर येथे पाठविण्यात आले त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी जेष्ठ नागरिकांनी अभिजित कुडे करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली व त्यांना आशिर्वाद दिला.

Share News

More From Author

विजयाच्या संकल्पाची मशाल हृदयात प्रज्वलित करा

जिवंत विद्युत तारा तुटल्याने लागली गोट्याला आग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *