मृतक मुलांच्या न्यायासाठी वडिलाचे मुंडण करून धरणे आंदोलन

Share News

🔹पाच महिने लोटुनही शवविच्छेदन अहवाल मिळाला नसल्याने न प संशयाच्या भोवऱ्यात

🔸धरणे आंदोलनाला अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा 

✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.2 जानेवारी) :- पाच महिन्यापूर्वी मालवीय वार्ड येथील रहिवासी सुभाष वांढरे यांचा मुलगा पूर्वेश वांढरे याचा नगरपरिषदद्वारे दिलेल्या कंत्राट दराच्या दुर्लक्षितपणामुळे मृत्यू झाला होता.

या प्रकरणातील मृताचा अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त न झाल्याने पोलीस प्रशासन व नगरपरिषद यांच्या अनागोंदी निष्काळजीपणामुळे पुर्वेश ला न्याय मिळण्यात दिरंगाई होत आहे त्यामुळे प्रशासना विरोधात बुधवारी जानेवारी 1 तारखेला तहसील कार्यालयासमोर मुंडण धरणे आंदोलन करण्यात आले, नगरपरिषदेने वरोरा येथील विदर्भ मल्टी सर्विसेस कंपनीला पाच लाख रुपये महिन्याप्रमाणे कंत्राट दिले होते हा कंत्राट तीन वर्षासाठी होता या कंपनीच्या कंत्राटद्वारे वरोरा शहरातील मालवीय वार्ड येथील पाणीपुरवठा करणाऱ्या वाल्वच्या टाक्यात सर्वत्र घाण दुर्गंधी पसरलेली होती .

या टाक्यात हिरवे पाणी ,कचरा चपला ,दारूच्या बाटल्या असल्याचे त्यावेळेस दिसून आले होते त्यामुळे या वार्डातील सुभाष वांढरे यांच्या चार वर्षीय मुलगा पूर्वेश वांढरे याचा मृत्यू झाला मृत्यू दूषित पाण्यामुळे झाल्याने डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज होता सुभाष पांढरे यांनी नगरपरिषद व पोलीस स्टेशन वर आहे ते लेखी तक्रार नोंदवून मृत्यूला दोषी असणाऱ्या कंत्राट दारावर त्वरित गुन्हे दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते.

मात्र काहीही कारवाई करण्यात न आल्याने शासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून प्रशासना विरोधात सुभाष वांढरे यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले या आंदोलनाला सुभाष वांढरे यांची पत्नी प्रगती वांढरे व सामाजिक कार्यकर्ते वैभव डहाणे, रमेश मेश्राम ,विलास नेरकर यांनी पाठिंबा दिला व वार्डातील महिला व पुरुषांची उपस्थिती होती सायंकाळी पाच वाजता मृतक पूर्वेश वांढरे यांचा फोटो घेऊन सामाजिक कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी असंख्य महिला पुरुषांसोबत सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा जेनिथ चंद्रा आयएएस यांचे दालनात निवेदन देण्यात आले ,हा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाल्याने मृतकाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते.

या अहवाला मधील अंतिम शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच दोषीवर कारवाई केल्या जाईल असे पोलीस विभागाद्वारे सांगण्यात आले मात्र पाच महिन्याचा खूप मोठा कालावधी लोटूनही अद्यापही शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला नाही घटना घडल्यानंतर नगरपरिषद वरोरा पोलीस स्टेशन वरोरा यांनी वेगवेगळ्या पाण्याचे नमुने एकाच प्रयोग शाळेत पडताळणी करण्यासाठी पाठवले होते.

त्यामध्ये नगर परिषदेने पाठवलेल्या पाण्याच्या नमुन्यात हे पाणी पिण्यायोग्य आहे तर पोलीस स्टेशन वरोरा यांच्या पाण्याचा नमुना पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने एकाच प्रयोग शाळेत एकाच दिवशी एका ठिकाणावरून एकाच पाण्याचा नमुना वेगवेगळा आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे .

आता तर जवळपास पाच महिन्याचा कालावधी लोटूनही अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त न होणे म्हणजेच नगरपरिषद अधिकारी विदर्भ मल्टी सर्विसेस कंपनीच्या कंत्राटदाराला व पोलिस अधिकारी वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आरोप मृतकाचे वडील सुभाष वांढरे यांनी केला आहे.

Share News

More From Author

विद्युत करंट लागून युवकाचा मृत्यू

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नियमबाह्य भरती विरोधात आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *