दुःखद बातमी ..वरोरा तालुक्यातील पिंपळगाव खेड्यातील जवान अक्षय निकुरे देशाच्या सीमेवर शहिद

Share News

🔸जम्मू काश्मीर च्या पाकिस्तान सीमेवर लढताना आले वीर मरण. उद्या दिनांक 26 डिसेंबरला अंत्यविधी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.25 डिसेंबर) :- जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात असलेल्या पिंपळगाव येथील निकुरे कुटुंबातील अक्षय हा देशाच्या सैन्यामध्ये काही वर्षांपूर्वीच भरती झाला होता, तो काल झालेल्या पाकिस्तान सैन्यासोबतच्या लढाईत शहिद झाल्याची दुःखद वार्ता पिंपळगावात पोहचली आणि सर्व गाव शोकसागरात बुडाले आहे अत्यंत सुस्वभावी आणि आई वडिलांना गर्व होईल असं कर्तृत्व असणाऱ्या अक्षयचा असा दुर्दैवी अंत होणार हे कुणालाही माहीत नव्हते मात्र तो देशासाठी शहिद झाला त्यामुळे अशा देशाभक्ताला आलेले वीर मरण निश्चितपणे पिंपळगाव येथील तरुणांना प्रेरणा देणारे ठरेलं असे बोलल्या जात आहे.

दरम्यान सगळा गाव निकुरे परिवाराच्या या दुःखद प्रसंगी त्यांच्यासोबत आहे आणि उद्या दिनांक 26 डिसेंबरला त्यांच्यावर शासकीय इतमानाने पिंपळगाव येथील स्मशान भूमीत अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या युनिट मधील अधिकारी यांनी दिली आहे.

Share News

More From Author

सी.डी.सी.सी.बँकेची परीक्षा नव्याने घ्या…सामाजिक कार्यकर्ते शुभम आमने यांची जिल्हाधिकाऱ्या कडे मागणी

चेतन लुतडे यांची व्हॉईस ऑफ मीडिया वरोरा अध्यक्ष पदी निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *