शेतकऱ्यांना दामदुप्पट भावाची प्रतीक्षा विधानसभा निवडणूक संपल्या तरी शेत पिकांचे भाव काही वाढेना

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.1 डिसेंबर) :- विधानसभा निवडणूक झाल्या . निवडणुकीच्या आधी शेतपिकांचे भाव वाढतील, या आशेवर शेतकरी होते. परतु, राजकीय नेते सत्तेच्या मागे लागले. निवडणुकीच्या विजय झाले. परंतु, अजूनही कापूस, सोयाबीन, शेतपिकांच्या भाववाढीचा प्रश्न अधांतरीच आहे. निवडणुका झाल्या आता तरी दामदुप्पट भाव मिळेल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

शेतकऱ्यांना मताचा जोगवा मागणारे नेते तसेच अधिकारी देखील निवडणुकीत व्यस्त होते.मात्र आता तरी शेतकऱ्यांचा कोणी तरी आता वाली दिसत नाही, अशी भावना शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे. जिल्हात यंदा कापूस, सोयाबीन, हरभरा, पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. त्यामुळे शेतपिकाला चांगला दर मिळेल, असा अंदाज शेतकऱ्यांना होता. शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले खरे.

मात्र, दर वाढण्याऐवजी शेतपिकातील दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे शेतकरी राजाची चिंता अधिकच वाढली आहे.सध्या विधानसभा निवडणूक झाली राजकीय नेते सत्तेत मागे धावत आहे.पण शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे काय? शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकरी पुत्र विनोद उमरे यांनी म्हटले आहे. या शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष देऊन भाववाढ करतील काय, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Share News

More From Author

शेगाव बु. गावातील तसेच गावलगत असलेल्या नालीचा उपसा करा

खरवड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा प्रतिसाद : आरोग्य शिबीर गरजूंसाठी संजीवनी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *