🔸सा.का.अक्षय बोंदगुलवार यांची मागणी
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.1 डिसेंबर) :- वरोरा तालुक्यामध्ये शेगाव बु. हे सर्वात मोठे गाव असून या गावची लोकसंख्या देखील सर्वात मोठी यासोबत गावची ग्रामपंचायत देखील मोठी आहे या ग्रामपंचायत मध्ये जनतेच्या सुख सोयीसाठी शासनाकडून अनेक प्रकारचा निधी मोठ्या प्रमाणात येत असतो .
परंतु हा निधी बेवारसपणे विनाकारण नको त्या ठिकाणी खर्ची केला जातो परंतु खरंच जनतेच्या आरोग्याचा विचार लक्षात घेता गावात असलेल्या नाल्या मध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक प्लास्टिक बाटला दारूच्या बाटला व अन्य साहित्य साचले असल्याने गावातून निघालेले सांडपाणी गावाबाहेर निघत नाही त्यामुळे या गढूळ पाण्यामुळे मच्छराचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे गावात अनेक प्रकारचे साथीचे रोग येत असून भविष्यात देखील येत असल्याची भीती नाकारता येत नाही.
करिता शासनाकडून येत असलेल्या शासकीय निधीतून गावातील नाली सफाई करून गाव मच्छर मुक्त करण्यात यावा याकरिता गेल्या अनेक दिवसांपासून येथील सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर श्री अक्षय बोंदगुलवार करीत आहे. शिवाय नाली सफाईचे काम फक्त आणि फक्त पावसाळ्यापूर्वी केली जाते त्यानंतर या नालीसफाईकडे ग्रामपंचायत कधी ढुकून देखील पहात नाही व नाली सफाईच्या कामाकरिता स्थानिक ग्रामपंचायती लाखो रुपयाचा खर्च दाखवतो परंतु हा खर्च विनाकारण खर्च होत असतो.
करिता सदैव करिता नाली सफाई करिता किमान दोन मजूर दररोज सफाई करण्याकरिता ठेवण्यात यावा जेणेकरून प्रत्येक वॉर्डमध्ये दररोज हप्त्यातून किमान दोनदा तरी नाली सफाई होईल व नागरिक असलेला गाळ बाहेर बाहेर निघेल यासोबत यात साचलेली घाण तसेच प्लास्टिक प्लास्टिक बाटला व अन्य साहित्य बाहेर पडेल व नाली स्वच्छ राहील व नालीतून धावणारे सांडपाणी गावाबाहेर निघेल व मच्छराचे प्रमाण कमी होऊन साथीचे रोग देखील सुद्धा कमी होईल तेव्हाच येथील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहील.
तेव्हा या गंभीर समस्या कडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यासोबत संबंधित प्रशासन यांनी या गंभीर समस्या कडे अधिक लक्ष देऊन गावातील तसेच गाव लगत असलेल्या नालीची रोज सफाई होण्याकरिता किमान दोन-तीन मजूर दररोज कामाकरिता ग्रामपंचायत कार्यालय शेगाव यांनी ठेवण्यात यावे अशी मागणी यावेळी गावचे सा .का .श्री इंजिनियर अक्षय बोंदगुलवार यांनी केली आहे.