🔸या आयुष्यात आपल्या सारखे स्नेही मिळाले तर,जगणं सोन्याहून पिवळे असतं
✒️चंद्रपुर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.29 नोव्हेंबर) :- भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील जीवन शिक्षण शाळा 1952 ते 1960 या वर्षी वर्ग 8 मध्ये शिकणारे विद्यार्थी यांचा स्नेहमिलन सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदनखेडा येथे झाला..
लक्ष्मण शामराव पराते,यशवंत निमजे,पांडुरंग पाटोळे यांनी पुढाकार घेऊन फोन वरून संपर्क करून 1952 ते 1962 या वर्षी 8 वर्गात शिकणारे यांना एकत्र आणून स्नेह मिलन सोहळयाच्या निमित्याने जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्या काळात शिकविणारे सदाशिव दोडके, नगो ठावरी, उत्तम झाडे, सदाशिव आगबत्तनवार, नारायण बावणे, नसररखा पठाण, याप्रसंगी उपस्थित होते. त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, सत्कार करण्यात आला, या प्रसंगी गावचे सरपंच नयन जांबुळे, लक्ष्मण पराते, यशवंत मिनजे, मधुकर शेंडे, पांडुरंग पाटोळे, माधव निमजे, माधव दोडके, उद्धव गजभे, श्रावण पोइनकर, रामदास जिवतोडे, वामन गायकवाड, सुधाकर मुरस्कर, गुणाबाई जांभुळे, कमाल कोकुडे, सुमन गौरशेट्टीवर, विमल गौरशेट्टीवर, विमल रणदिवे, नत्थू गजभे, यादव भोयर, विठ्ठल मुरस्कर, वारलू मांदाडे , वसंता शास्त्रकार, श्रीहरी भोयर, मेहबूबखा पठाण उपस्थित होते..
कार्यक्रमाच्या वेळी शाल मानचीन्न, भारताचे संविधान देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वांनी आपल्या आठवणी, परिचय, देऊन, सर्वांना सन्मानचिन्ह देण्यात आले. गुजगोष्टी , स्वादिष्ट भोजन, मनोरंजन खेळ यातून उपस्थित सर्वांनी आनंद लुटला. या सोहळ्याला जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक किशोर ठक व प्रतिभा गुंडमवर याचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन पंडित लेंडे, तर आभार सुभाष कुंभारे सरांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता आईचवार, राजेश गायकवाड अर्चना कुंभारे आदी शिक्षकांनी सहकार्य केले.