✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.29 नोव्हेंबर) :- तालुक्यातील खेमजई येथे पशुवैद्यकीय दवाखाना खेमजई, एम. थ्री.एम .फाउंडेशन आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 नोव्हेंबर 2024 ला पशुरोग निदान व लसीकरण शिबिर घेण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन खेमजईचे सरपंच मनीषा चौधरी यांनी केले. यावेळी उपसरपंच चंद्रहास मोरे, रमेश चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर धोत्रे, माजी पोलीस पाटील विश्वनाथ तुराण कर, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सतीश अगडते, एम थ्री एम प्रकल्पाचे समन्वयक अनिल पेंदाम इत्यादी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये जनावरांचे रोगनिदान, 291 जनावराचे लसीकरण, गर्भधारण तपासणी, वंधत्व निवारन व तपासणी करण्यात आली करण्यात आली. पशुधारकांना साथीचे रोग, एफ. एम.डी. लसीकरणाचे फायदे लसीकरणाचे फायदे व पशु आरोग्यावर सविस्तर मार्गदर्शन डॉक्टर सतीश अगडते यांनी केले. या परिसरातील दुधाचे प्रमाण वाढण्यासाठी अनिल पेंदाम यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रमोद गायकवाड, गोपाल राठोड, वैभव चौधरी, ईश्वर हजारे, युगांत चौधरी, मनीष चौधरी इत्यादींनी सहकार्य केले.