वायगाव (तु) येथे संविधान दिन निमित्त उद्देशिकाचे सामूहिक वाचन उत्साहात

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.27 नोव्हेंबर) :- नेहरू युवा केंद्र चंद्रपूर तथा श्री जगन्नाथ बाबा विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय वायगाव (तु) व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा यांच्या संयुक्त उपक्रम

भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.२६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी आपल्या देशाला संविधान दिले म्हणून दि.२६ नोव्हेंबर हा दिवस आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये भारतीय संविधान दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो.

या दिवसाचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्राचे माजी तालुका समन्वयक आशिष सुरेश हनवते यांच्या मार्गदर्शनाखाली वायगाव तु येथील श्री जगन्नाथ बाबा विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय वायगाव तु व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा यांच्या एकत्रित येऊन भारताचे संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पदयात्रा,कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्व उपस्थितांना विद्यार्थी विद्यार्थिनी यांना संविधानाचे महत्व, संविधानानी, दिलेले अधिकार व जबाबदारी याची जाणीव व्हावी या उद्देशाने उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी बार्टि चे तालुका समतादुत गणेश हनवते, अध्यक्ष नंदकिशोर धानोरकर, प्रमुख पाहुणे मंगेश बोढाले, अमृत ताजने, अविनाश टोंगे,खुशाल पाटिल, अर्चना जाधव , सुनील मोन्डे, रमेश करमनकर, विजय शेन्डे, हे उपस्थित होते.भारतीय संविधान हे न्याय स्वातंत्र्य, समता, बंधुता,या तत्वावर, आधारित असुन सर्वांना सामाजिक, आर्थिक, धार्मिक, स्वातंत्र्य प्रधान करते, त्यामुळे या देशात विविध जाती धर्माचे लोक असुन सुद्धा एकत्रित राहतात.भारतीय संविधान आपण सर्व भारतीय आहोत एक आहोत याची जाणीव करून देते.संविधानामुळे या देशात अखंडता,एकता आजही टिकून आहे.

संविधानाने दिलेले हक्क व जबाबदारी याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने उद्देशिकाचे सामूहिक वाचन घेण्यात आले.भारतीय संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन बार्टिचे समतादूत गणेश हनवते यांनी केले व उपस्थित असलेल्या सर्वांनी संविधानाच्या प्रचार,प्रसार व जनजागृती करण्याचा निर्धार केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर धानोरकर यांनी संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश बोढाले यांनी तर आभार अमृत ताजने यांनी मानले.

या क्रार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा केंद्र (युवा कार्यक्रम एंव खेल मंत्रालय भारत सरकार) व श्री जगन्नाथ बाबा विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय वायगाव (तु) बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा चे सदस्य आशिष हनवते, निखिल चौखे, कुणाल ढोल, राहुल कोसुरकार,प्रविण भरडे, देवानंद पांढरे,सहकार्यांनी मिळून केले.

Share News

More From Author

ट्रॅक्टर खाली पडून युवकचा मृत्यू

धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या…ना. श्री. सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *