स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दारू सह दोन लाखाचा मुद्देमाल

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.2 नोव्हेंबर) :- स्थानीक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना 

 मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत आरोपी नामे कैलास महादेव मांढरे , वय 22 वर्ष, रा. विजासन , ता. भद्रावती जि. चंद्रपूर + 3 यांना अवैद्यरित्या विक्री करिता मोटर सायकल व मोपेड ने देशी दारू वाहतूक करतांना खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला.

 *जप्त माल :-* 

१) 03 दुचाकी वाहने – किंमत 1,85,500/- ₹

२) 05 पेट्या देशी दारू – किंमत 17,500/-

      असा *एकूण 2,02,500/- रू.* चा मुद्देमाल मिळून आला. पो स्टे *भद्रावती येथे अप. क्र. 552 /2024 कलम 65(अ), 83 मदाका* अन्वये गुन्हा दाखल करून सदर मुद्देमाल मुद्देमाल मोहरर च्या ताब्यात देण्यात आला.

कारवाई पथक :-

स.फौ. स्वामिदास चालेकर, धनराज करकाडे, पो.हवा. नितीन कुरेकर, अजय बागेसर, पो. अं. शशांक बदामवर सर्व स्थागुशा चंद्रपूर.

Share News

More From Author

वरोरा पोलिसांची बेधडक कारवाई

चंदनखेडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *