🔹मुकेश जिवतोडे आज विधानसभेचे नामांकन अर्ज दाखल करणार
✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.28 ऑक्टोबर) :- ७५ वरोरा-भद्रावती मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे उद्या, सोमवार, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. या ऐतिहासिक क्षणी त्यांच्या समर्थनार्थ हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केला असून, यासाठी उद्या सकाळी १० वाजता स्थानिक धनोजे कुणबी सभागृह येथे एक सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेनंतर शिवसैनिकांच्या भव्य रॅलीच्या साक्षीने जिवतोडे नामांकन अर्ज दाखल करतील. रॅलीचा मार्ग धनोजे कुणबी सभागृह – वीर सावरकर चौक – डोंगरवार चौक – आंबेडकर चौक तहसील कार्यालय, वरोरा असा निश्चित करण्यात आला आहे.
मुकेश जिवतोडे यांनी शेतकरी, कामगार, तरुण, विद्यार्थी यांच्यासाठी नेहमीच आघाडीवर राहून कार्य केले आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टीकोन आणि प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा उद्देश घेऊन त्यांनी उमेदवारीचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या नेतृत्वाला शिवसैनिक आणि समर्थकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे रॅलीत प्रचंड गर्दी होण्याची अपेक्षा आहे.
सर्व शिवसैनिक आणि समर्थकांना या परिवर्तनाच्या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.